Operation Lotus
Operation Lotus  Sarkarnama
देश

Operation Lotus : महाराष्ट्रानंतर भाजपचं आणखी एका राज्यात 'ऑपरेशन लोटस'? : भाजप खासदाराचा दावा!

सरकारनामा ब्यूरो

Operation Lotus : बिहारच्या राजकारणात आता राजकीय घडामोडींना अचानकच वेग आले आहे. मकरसंक्रांतीचा सण पार पडल्यानंतर बिहारच्या राजकारणात प्रचंड काहीतरी मोठी घडामोड घडून येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रासारखंच बिहारमध्येही राजकीय खेळ होण्याचा दावा केला जात आहे.

याचं एक कारण म्हणजे बिहार सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री चंद्रशेखर यांनी केलेलं एक ताजं वक्तव्य. रामचरितमानस संदर्भात चंद्रशेखर यांनी ज्या प्रकारचं वक्तव्य केले, यावरूनच आता भाजपाकडून आता टीक करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर आता सरकारमधील प्रमुख पक्ष जदयूनेही चंद्रशेखर यांच्यावर टीका केली आहे. यामुळे आता महागठबंधन सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, अशी स्थिती दिसून येत आहे.

यानंतर भाजपचे खासदार प्रदीप सिंह यांनी मोठा दावा केला आहे. प्रदीप सिंह म्हणाले की, "बिहारमधील महागठबंधन होऊन सरकार स्थापन झाले असले तरी, जदयूमधील आमदार आणि खासदार असंतुष्ट आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी २०२५ मध्ये महागठबंधनचं नेतृत्व तेजस्वी यादवच करतील, अशी घोषणा केली होती. नितीश कुमारांच्या या निर्णयामुळेच जदयूमध्ये नाराजी आहे. अनेक जण या घोषणेमुळे अस्वस्थ आहेत. यामुळे आणखी थोडी प्रतीक्षा करा, बिहारमध्ये महाराष्ट्रासारखाच खेळ झालेला पाहायला मिळेल."

"मी केवळ राजकीय भाष्य करत नाहीये, तर मला याबाबत पूर्ण खात्री आहे. मात्र नेमकं काय होणार, याचा मात्र आताच खुलासा मी करणार नाही, असा दावा प्रदीप सिंह यांनी केले आहे. वेळ आल्यावर जे काही आहे, ते सगळं समोर येईल," असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, जून २०२२ मध्ये जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार पडल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झाले होते. याचे पडसाद बिहारमध्ये उमटले. बिहारमध्ये नितीशकुमारांनी भाजपाची साथ सोडत, राष्ट्रीय जनता दलासोबत महागठबंधनचे सरकार स्थापन केले. भाजपासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता. मात्र महाराष्ट्रासारखंच बिहारमध्ये राजकीय खेळ होणार असल्याचे संकेत भाजप खासदाराने दिले आहे. यानंतर आता पुढे बिहारमध्ये काय काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT