Narendra Modi - Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Operation Lotus : 'महाराष्ट्रानंतर आणखी एका काँग्रेसशासित राज्यात ‘ऑपरेशन लोटस?'

Operation Lotus : "भाजपचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत."

सरकारनामा ब्यूरो

शिमला : महाविकास आघाडीची सत्ता खालसा करत, महाराष्ट्रात संत्तातर घडले आहे. आता आणखी एका काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात भाजपचं 'ऑपरेशन लोटस' सुरू झाल्याची चर्चा होत आहे. नुकतेच निवडणुका होऊन हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले आहे. मात्र या ठिकाणी आता ऑपरेशन लोटस राबवण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

हिमाचलमध्ये काँग्रेस सरकार स्थापन होऊन 20 दिवस झाले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग आणि उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. आता मंडी शहरातील बाल्ह या मतदारसंघाचे भाजपचे आमदार इंद्र सिंग गांधी यांनी याबाबत दावा केला. जयराम ठाकूर हिमाचलचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. मात्र या दाव्यावर काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यापूर्वी भाजप सरकारमधील मंत्री राहिलेल्या विक्रम सिंह यांच्याकडूनही 'ऑपरेशन लोटस' बाबत सोशल मीडियावर पोस्ट केली गेली होती.

इंद्र सिंग गांधी यांनी एका खासगी वाहिनीला मुलाखतीत सांगितले की, ऑपरेशन लोटस सुरू करण्यात आले आहे. काँग्रेसलाही याबाबत कल्पना असेल. यासोबतच काँग्रेसचे 18 आमदार गायब असल्याबाबत त्यांनी भाष्य केले, दिल्लीत बसलेल्या नेत्यांना याबाबत, जास्त माहिती आहे, असेही ते म्हणाले. भाजपने काँग्रेसच्या आमदारांची पळवापळवी केली आहे का? या प्रश्नावरते एका शब्दात म्हणाले, "कदाचित."

विक्रम सिंह यांची फेसबुक पोस्ट :

भाजप सरकार असताना मंत्री राहिलेले विक्रम सिंह यांनी फेसबुक पोस्ट केली होती. पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, 'काँग्रेसचं सरकार आमच्या दबावाखाली नाही तर स्वतःच्या वजनाने पडेल...@ऑपरेशन लॉट्स. मात्र, यानंतर सिंह यांनी पोस्ट एडीट करून, ऑपरेशन लोटसचा केलेला उल्लेख काढून टाकला.

काँग्रेस आमदारांचे पलटवार :

काँग्रेस आमदार अजय सोलंकी यांनी भाजप दाव्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे ऑपरेशन लोटसचे स्वप्न पूर्ण होणार नाहीत. सोलंकी म्हणाले की, भाजप ऑपरेशन लोटसंबंधी भ्रम पसरवत आहे. राज्यात लवकरच मंत्रिमंडळाची स्थापना होईल. तसेच आमदारांच्या बेपत्ता होण्याच्या दाव्यावर ते म्हणाले की, सगळे आमदार आपल्या मतदारसंघात सुरक्षित आहेत. स्वतंत्रपणे कार्य करत आहेत.

काँग्रेसकडे बहुमत :

हिमाचल विधानसभेच्या एकूण 68 जागा आहेत, यातील काँग्रेसने 40, तर भाजपने 25 जागा जिंकल्या आहेत. तीन अपक्षांचाही विजय झाला. सत्ता स्थापन करण्यासाठी 35 आमदारांची आवश्यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT