Navi Delhi News, 07 Feb : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2025) निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास उरले असतानाच माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपकडून निकालाच्या आधीच 'ऑपरेशन लोटस' सुरु करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
शिवाय केजरीवाल (Arvind kejriwal) यांनी आपच्या 16 उमेदवारांना पक्ष बदलण्यासाठी भाजपने मंत्रीपद आणि 15 कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोपही केला आहे. शिवाय जर एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिल्लीत भाजपची सत्ता येणार असल्याचं सांगितलं जात आहे तर मग आमच्या उमेदवारांना फोन का करत आहात? असा सवालही केजरीवाल यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून उपस्थित केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, "काही एजन्सी दाखवत आहेत की शिवीगाळ करणाऱ्या पक्षाच्या 55 हून अधिक सीट येणार आहेत. मागील 2 तासांत आमच्या 16 उमेदवारांना फोन आलेत की 'आप' सोडून आमच्या पक्षात या, मंत्रिपदासह प्रत्येकाला 15-15 कोटी देऊ.
जर यांच्या पक्षाच्या 55 हून अधिक जागा येणार असतील तर मग आमच्या उमेदवारांना फोन करण्याची गरजच काय आहे? याचा अर्थ स्पष्ट आहे की खोटे सर्व्हे करवून घेतले आहेत, जेणेकरून वातावरण तयार करत काही उमेदवारांना फोडता येऊ शकेल. पण आमचा एकही उमेदवार फुटणार नाही.", असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडल्यानंतर गुरुवारी विविध एग्झिट पोलमध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला (BJP) 48 ते 49 टक्के मते मिळतील आणि 70 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत 45 ते 61 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर केजरीवाल यांनी भाजपवर आपच्या उमेदवारांना ऑफर दिल्याचा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.