Prime Minister Narendra Modi And Operation Sindoor sarkarnama
देश

Operation Sindoor Survey : ऑपरेशन सिंदूर, युद्धविरामाच्या निर्णयावर मोठा सर्व्हे आला समोर, मोदी सरकारवर जनता खूश की नाराज?

Operation Sindoor ceasefire Survey Public : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. अचानक युद्धविराम झाल्याबाबत देखील सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता.

Roshan More

Ceasefire Survey : पहलागम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने मोठं पाऊल उचलत पाकिस्तनामध्ये घूसून दहशतवाद्यांची अड्ड्यांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्ध देखील सुरू झाले. भारताने पाकिस्तानमध्ये पुन्हा घुसून पाकिस्तानचे 11 एअरबेस नष्ट केले.

भारत वरचढ ठरत असतना अचानक युद्धविराम घोषित करण्यात आला. या सगळ्या घडामोडींबाबत सी व्होटरने नागरिकांची मते जाणून घेत सर्व्हे केला. या सर्व्हेची आकडेवारी आता समोर आली आहे.

10,11 आणि 12 मे या तीन दिवस सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि युद्धविरामाबाबत संतुष्ट आहात का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर नागरिकांनी आपले मत नोंदवले.

पाकिस्ताविरुद्ध कारवाईने संतुष्ट

ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानवरील कारवाईच्या प्रश्नावर तब्बल 68.1 टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या या कामगिरीवर संतुष्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच 5.3 टक्के लोकांनी ते या कारवाईबाबत संतुष्ट नसल्याचे म्हटले आहे. तर, 15.3 टक्के लोकांनी या कारवाईबाबत संतुष्ट किंवा असंतुष्ट असे कोणतेच उत्तर दिले नाही.

युद्धविरामाबाबत 10 टक्के लोक नाराज

भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले. अचानक युद्धविराम झाल्याबाबत देखील सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. या युद्धविरामाबाबत आपण संतुष्ट असल्याचे 63.3 टक्के नागरिकांनी सांगितले. तर, युद्धविराम व्हायला नको होता असे 10.2 टक्के नागरिकांनी सांगितले.तर, 17 टक्के नागरिक तटस्थ राहिले त्यांनी काहीच उत्तर दिले नाही.

सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान की चीन?

सर्व्हेमध्ये सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान की चीन असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये 47.4 टक्के लोकांनी सांगितले की चीन हाच भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. तर, 27.7 टक्के लोकांनी पाकिस्तान हा भारताचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, 12.2 टक्के लोकांनी हे दोन्ही देश भारताचे मोठे शत्रू असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT