Operation Sindoor News: काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यावर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर 'बिग बी' अमिताश बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 19 दिवसानंतर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांनी कविता पोस्ट करीत पहलगाम घटनेवर आपला संताप व्यक्त केला आहे.
या घटनेवर बाबूजींची (हरिवंशराय बच्चन) कवितेची ओळ आठवली असे अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. भित्र्या राक्षसाने निघृणपणे हत्या केला..., मुलगी मोदींकडे गेली अन् म्हणाली, “ है चिता की राख कर में, माँगती सिंदूर दुनिया ..." अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे. नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, काल सांयकाळी युद्धविरामाची घोषणा झाल्यावर अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यामुळे भाईजानला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. पुढे सलमानने काहीच क्षणात ती पोस्ट त्याने डिलिट केली. सलमानने त्यात काय लिहिलं होते याची चर्चा आता होत आहे.
"युद्धविराम झाल्याबद्दल देवाचे खूप आभार". अशा शब्दात सलमानने पोस्ट काल पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट लिहिल्यानंतर सलमानने काहीच क्षणात ही पोस्ट आपल्या अकांऊटवरुन हटवली. या पोस्टवर नेटकऱ्यांनी सलमानला चांगलेच धारेवर धरलं. सलमानने गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरवर काहीच भाष्य केलं नाही. आता युद्ध थांबताच सलमानने पोस्ट केली आणि ती डिलीटही केली.
"स्वतःला भाई म्हणवणाऱ्या, बीईंग ह्यूमन आणि इतर.. गेल्या चार दिवसांपासून भाईजानला फक्त युद्धविरामाचीच काळजी आहे. त्याने पोस्ट डीलीट केली असली तरी भाईजानच्या सिनेमाबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आपल्याला चांगलंच माहितीय.." अशा शब्दात सोशल मीडिया युजर्सने सलमान खानचे कान उपटले आहेत.
तर दुसरीकडे 'सनम तेरी कसम' या सिनेमाचा अभिनेता हर्षवर्धन राणेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत मोठी घोषणा केली आहे. "सध्याची भारत-पाकची जी परिस्थिती आहे आणि माझ्या देशाबद्दल ज्या प्रतिक्रिया मी वाचतोय त्यामुळे मी एक निर्णय घेतला आहे. जर सनम तेरी कसम २ मध्ये आधीचे कलाकार पुन्हा असतील तर या सिनेमात मी काम करण्यास नकार देईल." अशा स्पष्ट शब्दांमध्ये हर्षवर्धनने त्याची नाराजी प्रकट केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.