PM Narendra Modi Viral Video: पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्धवस्त केले आहे. भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चे सर्वत्र कौतुक होत असून पहलगाम आणि बलुचिस्तानमध्ये नागरिकांची फटाके उडवून आनंद साजरा केला आहे.
अशातच मोदींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. भारताने पाकिस्तानला घाबरण्याचे कारण नाही, मी स्वत: लाहोर येथे जाऊन पाकिस्तानची ताकद काय आहे, हे पाहिले आहे, असे मोदी त्या व्हिडिओमध्ये सांगत आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींनी करारा जवाब मिलेगा, असे पाकिस्तानला ठणकावून सांगितले होते. त्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’ लॉन्च करीत मोदींनी पाकिस्तानला धडा शिकवला आहे. हे ‘ऑपरेशन सिंदूर’ ६-७ मे च्या मध्यरात्री राबविण्यात आले. यात 80 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या 26 जणांच्या कुटुंबियांनी या कारवाईबाबत आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला न्याय मिळाला, अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे.
अशातच मोदींचा जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे, हा व्हिडिओ एका चर्चासत्रातील दिसतो. पत्रकार मोदींना म्हणतात की आपल्याला सल्ला देण्यात आला आहे की पाकिस्तानाला घाबरुन राहा, कारण त्यांच्याजवळ अणुबॅाम्ब आहे. यावर मोदी म्हणतात, की पाकिस्तानची ताकद काय आहे, हे मी लाहोरला जाऊन तपासून आलो आहे.
"कुठल्याही सुरक्षा व्यवस्थेकडून तपासणी न करता मी लाहोरला गेलो होतो. येथील बातमीदार सांगत होतो. हे विना व्हिसा पाकिस्तानात कसे आले? याबाबतची चर्चा टिव्हीवर दाखवत होते. मोदी म्हणतात, अरे एकेकाळी हा माझाच देश होता,"
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मसूद अझहर याने निवेदन प्रसिद्ध केले आहे. भारताच्या बहावलपूरवरील हवाई हल्ल्यात त्याच्या 10 कुटुंबीयांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी अहवाल दिला आहे की त्याच्या घरात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर आज दुपारी 4 वाजता बहावलपूर, पाकिस्तान याठिकाणी अंत्यविधी होणार आहे, असे त्यांने सांगितले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.