Loksabha Sarkarnama
देश

Parliament Session : पंतप्रधान मोदींना विरोधकांनी दिली हाक; अधिवेशनात नेमकं काय घडलं ?

सरकारनामा ब्यूरो

Delhi : मणिपूरमध्ये झालेल्या दोन महिलांवरील आत्यचाराचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी उमटले. याबाबत पंतप्रधानांनी सभागृहात येऊन खुलासा करावा, असा आग्रहच विरोधकांनी धरला. यामुळे लोकभा आणि राज्यसभेत गोंधळ उडाला आणि विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. परिणामी सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेसमध्ये मणिपूर हिंसाचारावरून नवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. (Latest Political News)

संसदेचे पावसाळी अधिवेशन गुरुवारी (ता. २०) मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यानेच सुरू झाले. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करण्याच्या इरादा केल्याचे दिसून आले. विरोधकांनी मणिपूर हिंसाचारासह 'पंतप्रधानांनी सभागृहात यावे', अशी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणिपूर हिंसाचार आणि महिलांवरील लैगिंक अत्याचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यानंतर गुरुवारी दुपारी संसदेची दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली आहेत.

मणिपूरमध्ये ४ मे रोजी दोन महिलांवर पुरुषांच्या जमावाने अत्याचार केला. याचा 'व्हिडिओ' बुधवारी (ता. १९) 'व्हायरल' झाला. यानंतर गुरुवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले. मणिपूरमधील घटनांच्या मुद्यांमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभा सभागृहात गदारोध झाला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दुपारी दोन वाजता लोकसभेची बैठक सुरू झाली. त्यावेळी विरोधकांनी मणिपूर हिंसाचारावर घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी पंतप्रधानांना सभागृहात यावे, अशा घोषणा दिल्या.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "मणिपूरमधील हिंसाचार हा एक संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे आम्हाला चर्चा करायची आहे. गृहमंत्री चर्चेला सविस्तर उत्तर देतील. त्यामुळे मी सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू देण्याची विनंती केली. आम्ही मणिपूरबाबत चर्चेसाठी तयार आहोत. माननीय सभापतींना तारीख ठरवू द्या. आम्ही तयार आहोत. अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर व्हायची आहेत. अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायची आहे. उपनेते राजनाथ सिंह यांनीही आम्ही दोन्ही सभागृहात चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे."

लोकसभेचे अध्यक्षांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना सभागृहाचे कामकाज चालू देण्याची विनंती केली. ते म्हणाले, "सभागृह चर्चेसाठी तयार आहे. मणिपूर हिंसाचारावर सरकार चर्चेसाठी खुले आहे. मात्र विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्या. यामुळे सभागृहामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक विरोधी पक्षाचे सदस्य शांत न झाल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले." दरम्यान, विरोधकांच्या सततच्या घोषणाबाजीनंतर राज्यसभेचेही कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT