Opposition Meeting Sarkarnama
देश

Opposition Meeting in Bengaluru : भाजपविरोधकांची आज ठरणार रणनीती; बंगळुरूत बैठक, शरद पवार रवाना

BJP Vs Congress : किमान समान कार्यक्रम आणि जागावाटबाबत चर्चा

सरकारनामा ब्यूरो

Congress Invites Opposition in Bengaluru : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधकांची सोमवार (ता. १७)पासून दोन दिवशीय बंगळुरू येथे बैठक होत आहे. पहिल्या दिवशी राज्यातून या बैठकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रसचे शरद पवार आज मंगळवारी (ता. १८) उपस्थित राहणार आहे. यासाठी ते सकाळी रवाना झाल्याची माहिती आहे. पवारांच्या उपस्थित भाजपविरोधकांची रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Political News)

या बैठकीत विरोधकांची एकजूट करणे, सर्व पक्षांत किमान समान कार्यक्रामांची आखणी करण्यावर यावेळी विरोधकांचा भर असणार आहे. या बैठकीला नवीन आठ पक्षांना आमंत्रण देण्यात आले होते. बैठकीच्या पहिल्या दिवशी सोमवारी सर्व नेत्यांमध्ये विविधांगानी चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी या नेत्यांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीतीवर औपचारिक आणि विधिवत चर्चा होणार आहे. या बैठकीला भाजपविरोधक असलेले २६ पक्षांनी सहभाग घेतला आहे.

बैठकीसाठी काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी खासदार राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, बिहार के मुख्यमंत्री नीतीश कुमार, तमिलनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव, शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि इतर काही नेते सोमवारी बैठकीमध्ये सहभागी होते. शरद पवार मंगळवारी उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या बैठकीत १७ विरोधकांचा सहभाग

भाजपविरोधकांची पहिली बैठक २३ जून रोजी पाटणामध्ये झाली होती. त्या बैठकीचे आयोजन बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केले होते. त्यावेळी १७ राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. यात जनता दल (संयुक्त), राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी, द्रविड मुनेत्र कड़गम, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट, सीपीआईएमएल, पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी, नॅशनल कॉन्फरंस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), सपा, जेएमएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचा समावेश होता.

'या' नवीन पक्षांचा सहभाग

बंगळुरू येथे आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीला नवीन आठ पक्षांना आमंत्रण देण्यात आले आहे. यात मरूमलारची द्रविड़ मुनेत्र कड़गम, कोंगु देसा मक्कल काची, विदुलाई चिरुथिगल काची, रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक, इंडियन यूनियन मुस्लिम लीग, केरल काँग्रेस (जोसेफ) आणि केरल काँग्रेस (मणि) यांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT