Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करत त्यांच्या निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता या पहलगाम हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) तपास केंद्रीय गृहमंत्रालयानं एनआयएकडे सोपवल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक बुधवारी (ता.23) घटनास्थळी पोहोचले होते. ही संस्था स्थानिक पोलिसांकडून तपास हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. हल्ल्यासंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पोलिस ठाण्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की,सीमेपलीकडे बसलेल्या त्यांच्या मालकांच्या निर्देशानुसार आणि बेकायदेशीर शस्त्रे मिळवून अज्ञात दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचं नमूद केलं होतं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाममध्ये ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या बैसरन खोर्याला भेट दिली होती. याचवेळी त्यांनी श्रीनगरमध्ये पोलिस,गुप्तचर विभाग आणि लष्कराच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठकाही घेतल्या होत्या.
त्यांच्यानंतर एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक पहलगाममध्ये दाखल झाले होते. एका महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचा त्यात समावेश होता.या पथकानं पहलगाम येथे पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांना मदत करण्यास आणि सर्व साक्षीदारांचे जबाब तपासण्यास सांगितल्याची माहिती समोर आली होती.
दहशतवादविरोधी एनआयएचे पथक कर्वेनगर येथील संतोष जगदाळे यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली,असे अधिकाऱ्यांनी अधिक तपशील न देता सांगितले. एनआयएच्या दोन सदस्यीय पथकाने संध्याकाळी 5 ते 7 च्या दरम्यान जगदाळे कुटुंबाच्या निवासस्थानी भेट दिली होती.
एनआयए दोन सदस्यीय पथक काल सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान दिवंगत संतोष जगदाळे यांच्या पुणे कर्वेनगर येथील निवासस्थानी दाखल झाले होते. यावेळी पथकाने आणि जगदाळे यांची पत्नी आणि मुलीसह कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. दोन महिला जगदाळे यांच्यासोबत काश्मीरच्या सहलीला गेल्या होत्या आणि लोकप्रिय बैसरन खोऱ्यात सहलीचा आनंद लुटत असताना झालेल्या गोळीबारात त्या थोडक्यात बचावल्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला मंगळवारी (दि. 22 एप्रिल) झाला होता.या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता,ज्यात 2 परदेशी नागरिकांचा समावेश होता.या घटनेनंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा घेतला आहे.सरकारनं तातडीनं तपासाची सूत्र फिरवत आरोपी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा बैठक बोलावली होती.यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर,सुरक्षा दलांनी संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर कारवाई केली आहे. या कारवाईत आदिल गुरी आणि आसिफ शेख या दोघांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. त्यानंतर या हल्ल्यातील आणखी पुन्हा काही नव्या संशयित दहशतवाद्यांची घरं उध्वस्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.