PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tension Sarkarnama
देश

Pahalgam Terror Attack: घुसून मारा, मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, LOC जवळ लढाऊ विमानांच्या घिरट्या

PM Modi warning LOC fighter jets India Pakistan border tension: सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला 'जशास तसे'उत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे. सीमारेषेजवळील गावं रिकामी करण्यात आली आहेत.

Mangesh Mahale

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने परिस्थितीचा आढावा घेत हालचाली सुरु केल्या आहेत. यासाठी श्रीनगरच्या रनवेपासून नियंत्रण रेषेपर्यंत भारतीय सैन्याने सराव केला. राजस्थानच्या जंगलातही जवान युद्ध सराव करीत आहेत.

काल मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता. पाकिस्तान सैन्यानं नियंत्रण रेषेजवळ अनेक ठिकाणी गोळीबार केल्याचे व़ृत्त आहे. पहलगाम हल्लानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांनी ठार मारण्याचा उघडपणे इशारा दिला आहे. मोदींच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तानी सैन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी सैन्यात कमालीची भीत निर्माण झाल्याचे चित्र आहे.

सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबाराला 'जशास तसे'उत्तर देण्यास भारतीय लष्कर सज्ज आहे. दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराने आपल्या जवान आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. सीमारेषेजवळील गावं रिकामी करण्यात आली आहे. LOC जवळ रात्रभर पाकिस्तानची लढाऊ विमानं आकाशात घिरट्या घातल होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा करून दहशतवादाविरोधात एकजूट व्यक्त केली. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.

राहुल गांधींपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना मोदी सरकार निशाणा साधला आहे. त्यांचे काश्मीर मधले धोरण अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

देशभर पाकिस्तान सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. पाकिस्तान, दहशतवाद्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे. जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तान मुर्दाबाद’ आणि ‘आतंकवाद के खिलाफ एकजुट हो भारत’ अशा घोषणा देशभर ऐकू येत आहेत. दहशतवादांच्या धडा शिकवा, अशी मागणी मोदी सरकारकडे करण्यात येत आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा वैद्यकीय उपचारासाठी भारतात येतात. या नागरिकांमध्ये बहुसंख्येने दीर्घ मुदतीचा व्हिसा घेतलेले आहेत. हा व्हिसा पाच वर्षांसाठी वैध असतो, तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांचा असतो. त्यांना परत पाठवण्याच तयारी प्रशासन यंत्रणा करीत आहे.

महाराष्ट्रात दीर्घकालीन व्हिसावर तब्बल 17 ते 18 पाकिस्तानी नागरिक राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी सात ते आठ हजार हे एकट्या मुंबईत राहत असल्याचे देखील सांगितले जात आहे. पर्यटक व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांची संख्या देखील अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT