Pahalgam Terrorist attack Sarkarnama
देश

Pahalgam Terrorist Attack : 'टाळूवरचे लोणी' खाणाऱ्या विमान कंपन्यांना सरकारने आणले ताळ्यावर

Pahalgam Terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.

Hrishikesh Nalagune

Pahalgam Terrorist attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत. एका बाजूला ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीर खोऱ्यात हजारो पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. भयभीत अवस्थेमध्ये असलेल्या या सर्वांची घरी परतण्यासाठी धडपड चालू आहे. त्याचवेळी विमान कंपन्यांनी भाडेवाढ केल्याने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया पुढे येत होत्या. पण अवघ्या काही तासात सरकारने या कंपन्यांना ताळ्यावर आणले आहे.

मंगळवारी (22 एप्रिल) दुपारी हल्ला झाल्यानंतर अडकून पडलेल्या पर्यटकांनी काश्मीर खोरे सोडून घराकडे परतण्यास सुरुवात केली. मात्र जम्मू-श्रीनगर महामार्गावर काही ठिकाणी दरड कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद आहे. केवळ श्रीनगरमधील एक रस्ता वाहतुकीसाठी सुरू असल्याने पर्यटकांना परत येण्यासाठी विमान प्रवासाशिवाय दुसरा कोणता पर्याय शिल्लक राहिला नाही. त्यामुळे पर्यटकांनी श्रीनगरहून दिल्ली आणि मुंबईसाठी विमान पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. पण विमान कंपन्यांनी अचानक भाडे 20 हजारांच्या घरात नेले होते. रात्रीपर्यंत तर हे दर तब्बल 32 ते 36 हजारांच्या घरात गेले होते.

आपत्कालीन परिस्थितीत विमान कंपन्यांनी कृत्रिम दरवाढ केल्याने पर्यटकांची गैरसोय होऊ लागली. लोकांच्या भीतीचा फायदा घेऊन दर वाढवल्याने विमान कंपन्यांवर जोरदार टीका होऊ लागली. विमान कंपन्यांच्या नफेखोरीमुळे टुरिझम कंपन्या आणि पर्यटकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेरीस या प्रकरणात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. केंद्राने एक परिपत्रक काढून कंपन्यांना विमानांची संख्या वाढवावी आणि अशा प्रसंगी तिकिटांचे दर वाढवू नये असा आदेशच द्यावा लागला. त्यानंतर श्रीनगर-दिल्ली आणि श्रीनगर-मुंबई रुटवरचे दर जैसे थे झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT