PM Imran Khan Sarkarnama
देश

इम्रान खान बचावले; संसदेच्या उपसभापतींनी विरोधकांचा डाव उलटवला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर रविवारी मतदान होणार होते.

सरकारनामा ब्युरो

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावरील विश्वासदर्शक ठरावावर रविवारी मतदान होणार होते. त्यांची सत्ता जाणार, अशीच चर्चा सर्वत्र होती. विरोधकांनी जोरदार तयारीही केली होती. पण प्रत्यक्षात या ठरावावर कामकाज सुरू झाल्यानंतर संसदेच्या उपसभापतींनी हा ठरवा घटनाबाह्य असल्याचे स्पष्ट करत फेटाळून लावला आहे. त्यामुळे इम्रान खान यांना तुर्तास जीवनदान मिळाले आहे. (Imran Khan News Update)

पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेत (Parliament) अविश्वास ठराव मांडला आहे. त्यावर रविवारी मतदान होणार होते. पण परीक्षेला सामोरे जाण्याआधीच संसदेने हा ठराव फेटाळला आहे. परकीय शक्तींचा वापर करून पाकिस्तानमध्ये राजकीय अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद यांनी इम्रान खान यांना अटक होण्याची भीती व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, मला वाटते की, इम्रान खान यांना ते अटक करू शकतात. ते इम्रान खान यांना सहन करू शकत नाहीत. जवळपास 155 खासदार राजीनामा देऊ शकात. हा लोकशाहीसाठी मोठा धोका आहे. या स्थितीत निवडणुकीच एकमात्र पर्याय आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी याची दखल घेत निवडणुकांची तयारी करायला हवी, असंही शेख रशीद यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पाकिस्तानमध्ये मध्यावधी निवडणुका होणार का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

पीएमएलएन पक्षाच्या नेत्या मरियम औरंगजेब यांनी विरोधकांना 174 खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला आहे. मतदानाआधी विरोधकांच्या बैठकीत 177 खासदारांनी हजेरी लावल्याचा दावाही केला जात आहे. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाऊ शकते. सत्ता मिळवण्यासाठी त्यांना 172 चा आकडा गाठवा लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान दमछाक होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. इम्रान खान यांनी सत्ता टिकवण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. मित्रपक्षांना खूश करण्यासाठी विविध पदं दिली जात आहेत. तर विरोधी खासदारांना गळाला लावण्याचाही प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचे हे प्रयत्न सध्यातरी सफल होताना दिसत नाहीत. कारण विश्वासदर्शक ठराव मांडताना त्याबाजूने 161 खासदांनी मतदान केलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चर्चेला आला आहे.

सत्ताधारी आघाडीतील काही खासदारांनीही नाराजी व्यक्त करत इम्रान खान यांच्याविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. इम्रान खान सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनी राजीनामा दिला आहे. बुग्ती हे बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) जरदारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांकडे खान यांच्या विरोधातली प्रस्तावावर समर्थन मागितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT