Imran Khan
Imran Khan Sarkarnama
देश

इम्रान खान यांचा घोडेबाजार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर पहिली कुऱ्हाड

सरकारनामा ब्युरो

इस्लामाबाद : सत्ता वाचवण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी त्यांनी आता घोडेबाजार सुरू केला असून आपल्या पक्षातील नेत्यांचा बळी देत आहेत. मित्रपक्षांना सोबत ठेवण्यासाठी त्यांनी एका राज्याचे मुख्यमंत्रीच बदलले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्याच पक्षातील नेत्यांकडून आता नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. खान यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे त्यांनी आता हातपाय मारण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी पाकव्याप्त पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदावरून आपल्याच पक्षाच्या नेत्याला हटवत परवेज इलाही यांच्या गळात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली आहे. (Imran Khan News Update)

इलाई हे इलाही पाकिस्तान मुस्लिम लीग-कायद या पक्षाचे नेते आहे. या पक्षाचा खान यांच्या पाकिस्तान तहरीक एक इंसाफ (PTI) पक्षाला पाठिंबा आहे. इलाही यांच्याकडे पाच खासदार आहे. त्यांच्याआधी उस्मान बजदर हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर इलाही यांनी खान यांना पाठिंबा जाहीर केला. इतर पक्षांनाही खान यांनी गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे.

मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट-पाकिस्तान या पक्षालाही सोबत घेण्यासाठी खान यांनी तयारी केली आहे. सोमवारी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत खान यांच्या समर्थनावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. खान यांच्याकडून या पक्षाच्या नेत्याला मंत्रिपद दिले जाऊ शकते. या पक्षाचे नऊ खासदार आहेत. पण मागील काही दिवसांपासून खान यांच्यापासून हा पक्ष दुरावला होता.

खान यांना सभेपूर्वी जोरदार झटका

विरोधकांनी आणलेल्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधी इम्रान खान यांनी पक्षाच्या जंगी सभेचे आयोजन केलं होतं. पण त्याआधीच त्यांच्या मित्रपक्षाने जोरदार धक्का देत त्यांची साथ सोडली. त्यामुळे इम्रान खान यांना आता पायउतार व्हावे लागणार असल्याचे चर्चेनं जोर धरला आहे. इम्रान खान सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनी राजीनामा दिला आहे. बुग्ती हे बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी रविवारी पाकिस्तान पीपल्स पक्षाचे अध्यक्ष बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) जरदारी यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिलावल भुट्टो यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने अन्य विरोधी पक्षांतील नेत्यांकडे खान यांच्या विरोधातली प्रस्तावावर समर्थन मागितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT