Former PM Imran khan Sarkarnama
देश

Pakistan Former PM Imran Khan Arrested: पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

Imran Khan Arrested: भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक कऱण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सरकारनामा ब्युरो

Pakistan PM Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक कऱण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर इम्रान खान (Imran Khan) यांना पाकिस्तान रेंजर्सने अटक केली.

इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विट करून दावा केला आहे की, ते इम्रान खान यांना मारहाण करत आहेत. पीटीआयने ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये इम्रान खान यांचे वकील जखमी झाल्याचे दिसत आहेत. राजधानी इस्लामाबाद शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोणावरही अत्याचार झाला नसल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. इम्रानच्या अटकेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. (International News)

पंतप्रधान असताना इम्रान यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन बेकायदेशीरपणे उपलब्ध करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मलिक रियाझ यांनी हा आरोप केला होता. अटकेची धमकी देत इम्रान आणि त्याच्या पत्नीने कोट्यवधी रुपयांची जमीन आपल्या नावावर करून घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. नंतर रियाझ आणि त्याच्या मुलीचा ऑडिओही लीक झाला.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT