Pakistani youth claims he lived in India for 17 years, voted, and possesses Aadhaar and ration card—raising serious questions.  sarkarnama
देश

Pakistani Citizen In India : पाकिस्तानी नागरिक भारतात राहिला, मतदानही केलं; रेशनकार्ड, आधारकार्ड सगळी कागदपत्र जवळ

Pakistani National Lived in India for 17 Years : ओसामा म्हणाला, मी सरकारला विनंती करतो की आम्हाला थोडा वेळ द्यावा. मी इथे मतदान केलं आहे. माझ्याकडे रेशनकार्ड,आधारकार्ड इथलं डोमासाईल आहे.

Roshan More

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर व्हिजावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा पाकिस्तानमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पंजाबमधील अटारी बोर्डवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अनेक वर्षांपासून भारतात राहत असलेले पाकिस्तानी नागरिक आता समोर येत आहेत. अटारी बोर्डवरून पाकिस्तानमध्ये जात असलेल्या ओसामा या तरुणाने मागील 17 वर्षांपासून आपण भारतात राहत असल्याचे सांगितले.

ओसामा म्हणाला, मी सरकारला विनंती करतो की आम्हाला थोडा वेळ द्यावा. मी इथे मतदान केलं आहे. माझ्याकडे रेशनकार्ड,आधारकार्ड इथलं डोमासाईल आहे. जे काही तिथे (पहलगाममध्ये) घडलं ते पूर्णपणे चुकीचं आहे.माझी दहावी बारावी येथे झाली.

माझं भविष्य तिकडे काय?

'पहलगाम हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. धर्मापेक्षा माणुसकी सर्वात वर आहे. मी कम्युटर सायन्सचे शिक्षण घेत होतो. 2008 मध्ये आम्ही व्हिसावर येथे आलो. त्यानंतर व्हिजा स्टे केला होता. प्रॅक्टिकली आम्ही इथले नागरिक आहोत. माझे आधारकार्ड, डोमासाईल इथले आहे. येथून आम्ही कुठे जाणार? माझी दहावी बारावी देखील येथून झाली. परीक्षेनंतर मी मुलाखतीची तयारी करत होतो.मी येथून कुठे जाणार तिकडे (पाकिस्तान) माझं भविष्य काय असणार आहे. ', असे देखील ओसामा याने सांगितले.

मतदानकार्ड, आधारकार्ड कसे मिळाले?

ओसामाच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियामधून सरकारवर टीका करण्यात येत आहे. पाकिस्तानी नागरिक 17 वर्ष भारतात राहतो. त्याला इथले मतदानकार्ड, आधारकार्ड मिळते. तो निवडणुकीत मतदान करतो याचा अर्थ सरकारी यंत्रणांच्या मदतीशिवाय हे शक्य नाही, असे देखील सोशल मीडियामध्ये म्हणत सरकारवर टीका करण्यात येत आहे.

भारत सोडला नाही तर काय शिक्षा?

केंद्र सरकारने पाकिस्तानचे व्हिजावर भारतात आलेल्या नागिरकांचे व्हिजा तत्काळ रद्द केले आहेत. तसेच त्यांना पाकिस्तानामध्ये परत जाण्याचे निर्देश दिले आहेत. व्हिजा रद्द झाल्यानंतर देखील भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला तीन वर्षांची शिक्षा तसेच तीन लाखाचा दंडाची शिक्षा होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT