Pandit Shivkumar Sharma passed away Sarkarnama
देश

ज्‍येष्‍ठ संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचं निधन

प. शिवकुमार यांनी संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pandit Shivkumar Sharma : जगद्विख्यात संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचे आज (ता.10 मे) निधन झाले आहे. पंडित शिवकुमार हे ८४ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं आज सकाळी निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि पुत्र राहुल शर्मा असा त्यांचा परिवार आहे. प. शिवकुमार यांनी संतूर या वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देण्यात मोठे योगदान दिले आहे. (Pandit Shivkumar Sharma passed away News)

भारतीय अभिजात संगीतात पं. शिवकुमार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. काश्मीर येथील संतूर या लोकवाद्याला अभिजात संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून देण्याचे काम शिवकुमार यांनी केले. सोबतच भारतीय चित्रपट संगीतातही त्यांनी योगदान दिले. ‘सिलसिला’ या चित्रपटात बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या सोबत दिलेली साथ संगीत रसिकांच्या आठवणीत राहणारी ठरली. शिवाय त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरीने त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी 'शीव-हरी' या नावाने ओळखली जायची. यानंतर १९६७ मध्ये 'कॉल ऑफ द व्हॅली' हा अल्बमला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. या अल्बममध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबरही त्यांनी वादन केलं होते.

याबरोबरच प. शिवकुमार यांनी अनेक चित्रपटांना संगीतबध्द केले असून, त्यानंतर ‘फासले’ (१९८५), ‘चांदणी’ (१९८९), ‘लम्हे’ (१९९१), ‘डर’(१९९३) या चित्रपटांना संगीत दिले. याबरोबर प. शिवकुमार हे उत्तम गायकही होते. त्यांना राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये 1986 मध्ये संगित नाटक आकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री तर, 2001 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याबरोबरच 1985 मध्ये बल्टिमोर या सयुक्त राज्याचं मानद नागरिकत्वही त्यांना प्रदान करण्यात आल होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT