Deep Sidhu Accident News
Deep Sidhu Accident News 
देश

दीप सिद्धूचा अपघात की घातपात? ट्रक ड्रायव्हरला अटक

सरकारनामा ब्युरो

चंडीगढ : पंजाबी अभिनेता दीप सिद्धू (Deep Sidhu) याचा मंगळवारी (१५ फेब्रुवारी) एका अपघातात निधन झाले. तो ३७ वर्षांचा होता. स्कॉर्पिओ गाडीने जात असताना कुंडली सीमेजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला त्याची कार धडकली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेत गाडीच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. सुदैवाने या अपघातातून त्याची गर्लफ्रेंड रीना रॉय बचावली. पण अपघाताचे अनेक फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. तर, ज्या ट्रकला सिद्धूच्या गाडीची धडक बसली तो ट्रकचालक फरार झाला होता. (Deep Sidhu Accident News)

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचं नाव कासिम आहे. कासिम हा हरयाणातील नहू गावचा रहिवाशी आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. धक्कादायक म्हणजे दीपच्या कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दीपच्या भावाने ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकला सिद्धूची गाडी धडकल्याने अपघात झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली होती.मात्र ट्रक रस्त्याच्या कडेला नसून दीपची गाडी वेगात पुढे जात होती, असल्याची माहिती समोर आली आहे. तर दीपची गर्लफ्रेंड रिना रॉयने दीपकला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असून चालकाकडून अधिक चौकशी केली जात असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढली तेव्हा दीप सिद्धू चर्चेत आला. त्यावेळी काही लोकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक ध्वज लावला. या प्रकरणात दीप सिद्धू यांच्यावर आंदोलकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. शेतकरी चळवळीत आपला वाटा दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, नंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

दीप सिद्धू याचा जन्म 2 एप्रिल 1984 रोजी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यात झाला. त्याचे वडील सरदार सुरजित सिंग हे वकील होते. दीप सिद्धू अवघ्या 4 वर्षांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले. दीप सिद्धूने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. त्याने कायद्याचेही शिक्षण घेतले होते. तो किंगफिशर मॉडेल हंटचा स्पर्धेचा विजेता होता. मिस्टर इंडिया स्पर्धेतही त्याने मिस्टर पर्सनॅलिटीचा किताब पटकावला. 2015 मध्ये त्याचा पहिला पंजाबी चित्रपट 'रमता जोगी' रिलीज झाला. 2018 च्या जोरा दास नंबारिया चित्रपटातील अभिनयाने त्याला प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्याने एका गँगस्टरची भूमिका साकारली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT