Vinesh Phogat | Narendra Modi Sarkarnama
देश

Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट ऑलिम्पिकमधून अपात्र,पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक; म्हणाले, ' तू चॅम्पियन...'

Roshan More

Vinesh Phogat Disqualified From Paris Olympics 2024 : विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये आज (बुधवारी) सुवर्ण पदकासाठी 50 किलो गटात कुस्ती फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे सांगत तिला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले.

विनेशसह भारतीयांसाठी हा मोठा धक्का आहे. विनेश अपात्र घोषित होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशसाठी भावुक ट्विट केले. 'विनेश, चॅम्पियन्समध्ये तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, आजचा धक्का दुख:देणारा आहे. मी माझी निराशा शब्दात व्यक्त करू शकत नाही. तू निर्भीडपणे संकटाचा सामाना केला आहे.आव्हाने स्वीकारणे हा तुझा नेहमीच स्वभाव राहिला आहे. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT