Sanjay Raut ,Gautam Adani Sarkarnama
देश

Parliament Session Live : अदानींच्या विरोधात राऊत आज पुरावे देणार

Sanjay Raut Demands jpc on Gautam Adani : जे सरकारला प्रश्न विचारतात, ते भाजपच्या निशाण्यावर असतात. त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut News: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्यातील आज (बुधवारी) तिसरा दिवस आहे.

गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी लंडन येथे केलेल्या विधानाचे पडसाद सभागृहात उमटले. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, उद्योगपती गौतम अदानी या मुद्दांवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही.

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज मोदी सरकार, भाजपवर निशाणा साधला. "जे सरकारला प्रश्न विचारतात, ते भाजपच्या निशाण्यावर असतात. त्यांच्यामागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. त्यांच्यावर कारवाई करुन त्यांना कारागृहात टाकले जाते. त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात," असे राऊतांनी स्पष्ट केले.

" गौतम अदानी यांना आतापर्यंत एकही समन्स तपास यंत्रणेने पाठविलेले नाही. आज मी अदानी यांच्याविरोधात सभागृहात पुरावे सादर करणार आहे," असे राऊत म्हणाले. संजय राऊतांनी ठाकरे गटाला टार्गेट करण्याचं राजकारण सुरू असल्याचं सांगितलं.

“जगातील १०० शक्तिशाली युवकांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरेंचा यांचा समावेश होणं हा महाराष्ट्रासह देशाचाही गौरव आहे. एकीकडे देशाला ऑस्कर मिळाला आणि दुसरीकडे आदित्य ठाकरेंची १०० शक्तिशाली युवकांमध्ये समावेश झाला. यासाठी आम्ही सगळे आनंदी आहोत,” असे राऊत म्हणाले.

शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले “मुंबईत सध्या मुका घ्या मुका सिनेमा सुरू आहे. या व्हिडीओ प्रकरणात ठाकरे गटााच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहेत? त्यांचा या प्रकरणाशी संबंध काय आहे? हा सत्तेचा गैरवापर आहे. आम्ही सांगितलं होतं जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला. मुळात हा व्हिडीओ खरा की खोटा हे आधी समोर येऊ द्या. हा व्हिडीओ आमदाराच्या मुलाने शेअर केला आहे. त्याला अटक का केली नाही?"

राहुल गांधी सभागृहात माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तर अदानीनी जेपीसीच्या माध्यमातून चौकशी करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. अदानीच्या मुद्यांवर आज १८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेऊन रणनीती आखली आहे. ईडीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या प्रस्तावावर सह्या करण्यात आल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT