FM Nirmala Sitharaman Announcements Sarkarnama
देश

Parliament Budget Session 2024 Live Updates: अर्थसंकल्पात 'या’ 9 क्षेत्रांवर मोदी सरकारचा सर्वाधिक भर

FM Nirmala Sitharaman Union Budget 2024-25 Speech LIVE in Marathi : पीएम योजनेंतर्गत 20 लाख तरुणांना रोजगारांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना उद्योग क्षेत्रात कुशल बनवणार आहे.

Mangesh Mahale

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.यात गरीब, महिला, युवा आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर दिला आहे. बजेटमध्ये 9 क्षेत्रांवर फोकस करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री सीतारामन या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

या नऊ क्षेत्रांवर फोकस

१)कृषी आणि उत्पादकता

२) रोजगार आणि कौशल्यविकास

३) मानव संसाधन विकास आणि सामाजिक न्याय

४) सेवा-सुविधा

५)शहरी विकास

६)ऊर्जा सुरक्षा

७)पायाभूत सुविधा

८)संशोधन आणि विकास

९)नव्या पिढीचा विकास

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री म्हणाल्या..

  1. वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना डीबीटी सुविधा मिळेल.

  2. पीएम योजनेंतर्गत 20 लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणार

  3. सरकार येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कौशल्य बनवणार आहे.

  4. मुद्रा लोनची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

  5. आता वीस लाखांपर्यंत मुद्रा लोन मिळणार आहे.

  6. 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरूणांना इंटर्नशीप देणार.

  7. त्यांना महिन्याला 5 हजार रूपये मिळणार

  8. पंतप्रधान जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा

  9. एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार

  10. एक कोटी घरांना मोफत सौरउर्जा देण्याची घोषणा

  11. पंतप्रधान सूर्यघर मुफ्त बिजली योजनेची अर्थसंकल्पात घोषणा

  12. पर्यटन ठिकाणाच्या विकासासाठी विशेष निधींची घोषणा

  13. पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा

  14. राज्य सरकारनेही पायाभूत सुविधांवर भर देण्यासाठी त्यांना विशेष निधी, लोन देण्यात आले आहेत

  15. पाच वर्षात 11 लाख 11 हजार कोटींची पायाभूत सुविधांसाठी तरतूद

  16. केंद्राने देशातील सर्व पायाभूत सुविधा चांगल्या करण्याचा प्रयत्न केला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT