बिहार आणि आंध्रप्रदेशवर घोषणांचा वर्षाव अर्थसंकल्पात करण्यात आला. महाराष्ट्रातील खासदारांनी याचा निषेध करून आंदोलने केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही. देशातील ग्रामीण भागातील जनतेसाठी काहीही घोषणा नाही. अर्थसंकल्पातील सर्व घोषणा वाऱ्यावरची वरात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
3 लाखांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही. 3 ते 7 लाख उत्पन्नावर 5 टक्के आणि 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर लागणार आहे.
सोने आणि चांदीवरील सीमा शुक्लात 6 टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होणार आहे.
15 वर्षांसाठी राज्य सरकारांना बिनव्याजी कर्ज मिळणार
कॅन्सरची 3 औषधे कस्टम ड्युटीतून मुक्त
ग्रामीण भागातील जमिनींच्या नोंदणीचे डिजिटलायझेशन करणार
मोबाईल फोन, चार्जवरील आयात शुक्ल 15 टक्के कमी केला आहे. त्यामुळे मोबाईल फोन आणि चार्जर स्वस्त होणार आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याद्वारे देशातील 25 हजार गाव मुख्य रस्त्यांना जोडण्यात येणार आहे.
गावांमध्ये पोस्ट बँकेच्या 100 शाखा उघडण्यात येणार
पंतप्रधान सूर्यघर योजना राबवण्यात येणार आहे. योजनेमुळे 1 कोटी जनतेला फायदा होणार आहे. 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
100 शहरांमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी योजना
शहरातील 1 कोटी गरीब जनतेसाठी गरीब आवास योजना
काशी विश्वनाथ कॉरिडोअरसाठी अधिकचा निधी देण्यात येईल. बिहारमध्ये महाबोधी मंदिर कॉरिडोअर बनविण्यात येणार. नालंद विद्यापीठात टुरिस्ट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार. हिंदू, जैन, बौद्ध धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार. ओडिशातील धर्मस्थळांचा विकास करण्यात येणार आहे.
महिला आणि मुलींसाठी 3 लाख कोटींची योजना...
भारतात नवे 12 इंडस्ट्रियल हब उभारण्यात येणार
500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरूणांना इंटर्नशीप देणार. त्याद्वारे महिन्याला 5 हजार रूपये तरूणांना मिळतील.
मुद्रा लोनची मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात आली.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शैक्षणिक कर्जासाठी 3 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. देशांतर्गत शिक्षणासाठी 10 लाखांची मदत सरकार करणार
नवे कौशल्य विकास कोर्स सुरू करणार
पीएम विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न
नव्या रोजगारांसाठी 2 लाख कोटींची तरदूत
बिहारमधील रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटी रूपये आणि नव्या मेडिकल कॉलेजची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली आहे.
कृषी क्षेत्रासाठी 1 लाख 52 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं.
रोजगार वाढवणं, कौशल्य विकास यावर आमचा भर आहे. विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या.
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी सध्या कठीण काळ सुरू. कठीण काळाताही भारताची अर्थव्यवस्था चमकत आहे, असं अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं.
पंतप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला 5 वर्षांसाठी मुदतवाढ देण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारमण यांनी केली.
भारताची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होत राहिल. महागाई नियंत्रणात आणणे ही आमची प्राथमिकता, असं अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटलं.
जनतेला 'एनडीए'च्या धोरणांवर विश्वास आहे. महागाईचा दर स्थिर आणि नियंत्रणात आहे, असं अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितलं.
मोदी सरकार 3.0 पहिले बजेट मांडण्यात येत आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत दाखल झाले आहेत.
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले आहेत. बैठकीत केंद्रीय अर्थसंकल्पाला मंजूर दिली जाणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आपल्यासोबत रेड टॅबलेट घेऊन राष्ट्रपती भवनात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरीदेखील उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री सीतारामन यांचं तोंड गोड केलं आहे.
"हा अर्थसंकल्प पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ सबका विकास' या मंत्रावर आधारित आहे," अशी प्रतिक्रिया अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी '3.0' सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडतील. अर्थमंत्री सीतारामन सलग '7' व्यांदा अर्थसंकल्प मांडत आहेत. या अर्थसंकल्पाकडून पगारदार वर्गाला मोठ्या अपेक्षा असणार आहे. सरकार 2023 च्या अर्थसंकल्पात सादर केलेल्या नवीन कर प्रणालीतील कथित उणीवा दूर करेल, अशी अपेक्षा आहे. शेतकरी, मध्यमवर्ग, व्यावसायिकांना अर्थसंकल्पातून काय मिळते? याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.