Delhi : लोकसभेत बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्यापैकी दोघांनी थेट खासदार बसलेल्या ठिकाणी उडी मारली. तसेच स्मोक कँडल जाळल्या. जेव्हा हे दोन तरुण लोकसभेत स्मोक कँडल जाळत होते. तेव्हा संसदेच्या आवारात त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी रंगीत फटके फोडून घोषणाबाजी केली. घोषणा देणाऱ्यामध्ये नीलम कौर नामक एका महिलेचा समावेश होता. आम्ही विद्यार्थी आहोत. बेरोजगार आहोत. हे सरकार हुकूमशाही करत असल्याचे देखील नीलमने सांगितले. पोलिसांनी तिला आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
नीलम हिने संसदेच्या बाहेर रंगीत फटाके फोडल्यानंतर तानाशाही नही चलेगी, भारत माता की जय, जय भीम असा घोषणा दिल्या. जी हुकूमशाही आहे तिच्या विरोधात आम्ही आहोत. जनतेचे अधिकार संपवले जात आहेत. आम्हाला टाॅर्चर केलं जातं. सरकारची ही हुकुमशाही चालणार नाही. त्यामुळे कुठलही दुसरं माध्यम नाही. आम्ही कुठल्याही संघटनेचे नाही. आम्ही विद्यार्थी, बेरोजगार असल्याचे नीलम म्हणाली आहे.
लोकसभेत स्मोक कँडल फोडणाऱ्यांमध्ये लातुरमधील अमोल शिंदे याचा समावेश होता. त्याने आणि नीलम यांनी संसदेच्या परिसरात घोषणाबाजी करत रंगीत फटाकडे फोडले. तर, लोकसभेत सागर शर्मा आणि मनोरंजन यांनी प्रेक्षक गॅलेरीतून उडी मारली. सागर याला मुबंईतील खासदार मनोज कोटक यांनी पकडले. तर, मनोरंजन हा खासदारांच्या डेस्कवरून उड्या मारून लोकसभेच्या अध्यक्षांच्या आसनाकडे जात होता.तेव्हा त्याला पकडण्यात आले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संसदेत घुसखोरी करणारे कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत,याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अमोल शिंदे याच्या लातूर जिल्ह्यातील चाकूरचा झरी गावाचा आहे. त्याच्याघरी तपासासाठी पोलिस गेल होते. पोलिसांनी त्याच्या घराच्यांकडे अमोल विषयी चौकशी केली. अमोलच्या वडिलांनी सांगितले की अमोल लष्करभरतीसाठी जात असल्याचे सांगून घरातून गेला आहे. तीन ते चार दिवसापासून त्याचा फोन देखील बंद आहे.
(Edited by Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.