📝 3 महत्वाचे मुद्दे (Summary)
पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारची तयारी: 8 नवे विधेयक, त्यात आयकर विधेयक महत्त्वाचे असून त्यावर संसदेत चर्चा अपेक्षित आहे; पहलगाम, ऑपरेशन सिंदूर व अहमदाबाद विमानतळ हे मुद्दे अधिवेशनात चर्चेच्या केंद्रस्थानी राहतील.
विरोधकांचा आक्रमक अजेंडा: ‘ऑपरेशन सिंदूर’, पाकिस्तानबरोबर संघर्षविराम, ट्रम्पचे दावे आणि मोदींचे मौन या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरणार; संविधान बदलाच्या आरोपामुळे ‘संविधान बचाव’ मोहीम गतीमान होणार.
राजकीय संघर्ष तीव्र होणार: संघाच्या ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ शब्द हटवण्याच्या सूचनेवरून काँग्रेसने संघ-भाजपवर आरोप केले; मतदार यादी पुनरावलोकनावरूनही वाद संभवतो.
Parliament Monsoon session 2025:संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात मोदी सरकार 8 नवे विधेयक सादर करणार आहे. अन्य प्रलंबित विधेयकांवर चर्चा होणार आहे. यात आयकर विधेयक हे महत्वाचे आहे,
यावर 13 फेब्रुवारी रोजी लोकसभेत सादर करण्यात आले होते. अहमदाबाद विमान, ‘पहलगाम’,‘ऑपरेशन सिंदूर’हे तीन विषय अधिवेशनात गाजणार आहे. सत्ताधारी मोदी सरकारव घेरण्यासाठी विरोधकांची तयारी पूर्ण झाली आहे.
मोदी सरकारने ‘ऑपरेशन सिंदूर’ची लष्करी कारवाई करुनही आणि पाकिस्तानने ‘संघर्ष विरामा’ची याचना करुनही ते दहशतवादी पकडले का गेले नाही, हा प्रश्न विरोधकांच्या अजेंड्यावर आहे. लष्करी कारवाईदरम्यान पाकिस्तानला घायकुतीला आल्याचे दिसत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या वतीने केलेली ‘संघर्ष विरामा’ची घोषणा, भारत-पाकिस्तान यांना ‘संघर्ष विराम’ करण्यास भाग पाडल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केलेला दावा आणि त्यावर विरोधकांनी वारंवार विचारणा करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले मौन, यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय राज्यघटनाच बदलून टाकण्याचा संघ आणि सत्ताधारी भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या मागणीमुळे राहुल गांधी यांच्या ‘संविधान बचाओ’ मोहीमेला आणखी बळ मिळाले आहे. ‘इंडिया आघाडी’ला अधिक मजबूत होणार आहे. राहुल गांधी यांनी हा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून लावून धरल्यामुळे संसदेत मोदी सरकार आणि विरोधी पक्षांमधील जुंपणार आहे.
भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी करीत विरोधी पक्षांच्या हाती आणखी एक कोलित दिले. ही मागणी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या आत्म्यावर केलेला आघात असल्याचा आरोप करीत काँग्रेसने भारतीय राज्यघटनाच बदलून टाकण्याचा संघ आणि सत्ताधारी भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप इंडिया आघाडीने केला आहे.
लोकसभेचे खासदार बैजयंत पांडा आणि सुप्रिया सुळे हे आयकर विधेयकासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर करणार आहे. मतदारयाद्यांचे नव्याने पुनरीक्षण करुन सत्ताधाऱ्यांना मते न देणाऱ्या गरीब आणि उपेक्षितांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्याचा निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी भाजपने खासदारांनी राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी बैठक झाली. बैठकीत विरोधकांच्या प्रश्नांना कसे प्रत्युत्तर द्यायचे याबाबत रणनीती ठरविण्यात आली असल्याची माहिती आहे.
प्रश्न: पावसाळी अधिवेशनात कोणते विधेयक सर्वाधिक महत्त्वाचे आहे?
उत्तर: आयकर विधेयक हे सर्वाधिक महत्त्वाचे विधेयक आहे.
प्रश्न: 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात विरोधकांचा आरोप काय आहे?
उत्तर: पाकिस्तानने संघर्षविराम मागूनही दहशतवादी पकडले गेले नाहीत, असा आरोप आहे.
प्रश्न: काँग्रेसने राज्यघटना बदलावर कोणता आरोप केला?
उत्तर: भाजप व संघ राज्यघटना बदलण्याचा कट रचत असल्याचा आरोप आहे.
प्रश्न: विरोधकांचे मतदार यादीबाबतचे मत काय आहे?
उत्तर: गरीब मतदारांना वगळण्याचा निवडणूक आयोगाचा डाव असल्याचा आरोप आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.