Narendra Modi Lok Sabha Speech Sarkarnama
देश

Narendra Modi Lok Sabha Speech : आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केले ; सरदार वल्लभभाई पटेल यांनाही काँग्रेसने..

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत हल्लाबोल केला. परिवारवाद, दरबारवादाला काँग्रेसने पसंत केले. अनेक महापुरुषांनी परिवारवादाचा विरोध केला. महापुरुषांचा राजकारणातील हक्क काँग्रेसने हिरावून घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांनाही काँग्रेसनं डावलयं, परिवारवादातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने दोन वेळा पराभूत केले. परिवारवादाशी संबधीत नसलेल्या महापुरुषांचे फोटो काँग्रेसने संसदेत लावले नाहीत, असे सांगत मोदींनी काँग्रेसच्या कार्यशैलीवर घणाघात केला.

विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्ताव चर्चेत नरेंद्र मोदींनी लोकसभेत उत्तर दिले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. "परिवारवाद, गरिबी, दहशतवाद म्हणजे काँग्रेस" असे मोदी म्हणाले.

अविश्वास प्रस्तावावर बोलताना मोदी यांनी २०२८ मध्येही काँग्रेस जेव्हा अविश्वास प्रस्ताव आणेल तेव्हा भारत जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर असेल," असे ठामपणे मोदींनी विरोधकांना सुनावले. "विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो. एनडीए आणि भाजप 2024 च्या निवडणुकीत सर्व विक्रम मोडून पुन्हा सत्तेत यावे हे तुम्ही ठरवल्याचे मला दिसत आहे," असा टोला मोदींनी लगावला.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची मोदींनी खिल्ली उडवली. "काँग्रेसकडे स्वतःचं असं काहीच नाही, पक्ष नाही, विचार नाही, चिन्ह नाही, एवढंच काय काँग्रेसने मतांसाठी गांधी नावही चोरलं." असा टोमणा मोदींनी हाणला. "काँग्रेसची नीती, नियतही चांगली नाही, देशाच्या जनतेने काँग्रेसवर 'नो कॉन्फिडन्स' दाखवला आहे, असे सांगून मोदींनी काँग्रेसच्या पराभवाचा इतिहास सभागृहात सांगितला. मोदींच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. मोदींचे भाषण सुरू असताना विरोधकांनी सभात्याग केला.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT