Parliament session : अधिवेशनाच्या काळात दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. विरोधकांनी संसदेचे कामकाज चालू देत नसल्याचे सत्ताधारी सांगत आहेत. तर, विद्यार्थ्यांवर बॅलेज गन चालवण्याचे आदेश गृहमंत्री अमित शाह यांनीच दिल्याचा आरोप करत त्यांनी माफी मागावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक तसेच एफसीआरए लोकसभेच्या पटल्यावर मांडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. हे विधेयक पास करत विरोधकांना दणका देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. या पार्श्वभूमीवर 10 तारखेला भाजपसह एनडीएतील खासदारांनी दिल्लीत उपस्थित राहावे, अशा कडक सूचना भाजपकडून करण्यात आल्या आहेत. तसेच व्हिप जारी करण्यात आला आहे.
भाजपच्या हालचालीनंतर कांग्रेस देखील सावध झाली आहे. काँग्रेसने तीन ओळींचा व्हिप जारी करत आपल्या खासदारांना 10,11 आणि 12 ऑगस्टला संसदेत उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. कुठल्याही सबबीखाली गैरहजर राहू नये, असा कडक इशाराही दिला आहे.
संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता आहे. शिवाय इतर महत्त्वाची विधेयक देखील भाजप लोकसभेच्या पटलावर मांडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हा व्हिप जारी केल्याची चर्चा आहे. भाजपने आवश्यक ते संख्याबळ जपवले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेसह एफसीआरए हे विधेयक देखील मंजुर होण्याचा विश्वास भाजप नेते व्यक्त करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.