Central government teachers policy Sarkarnama
देश

TET Issue in parliament : ‘शाळा बंद’च्या एक दिवस आधीच संसदेत पोहोचला ‘टीईटी’चा मुद्दा; मोदी सरकार शिक्षकांसाठी घेणार का मोठा निर्णय?

Dairyashil Mane Lok Sabha speech : टीईटीच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह विविध संघटनांनी उद्या राज्यात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

Rajanand More

Teachers Eligibility Test policy : देशभरातील शिक्षकांना आपली नोकरी वाचविण्यासाठी तसेच नव्याने शिक्षक भरतीसाठी शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच TET बंधनकारक करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात यावरून कार्यरत शिक्षकांमध्ये अंसतोष निर्माण झाला आहे. संघटनांकडून उद्या (ता. ५) शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. त्याआधीच हा मुद्दा आज लोकसभेत गाजला.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी आज टीईटीचा प्रश्न लोकसभेत मांडत केंद्र सरकारकडे महत्वपूर्ण मागणी केली. ते म्हणाले, देशातील शिक्षकांच्या एका प्रश्नाकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. २५ लाख शिक्षकांचे भविष्य यावर अवलंबून आहे. टीईटी ही टेस्ट शिक्षण हक्क कायदा लागू झाल्यानंतर सुरू झाली. देशभरात ५३ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना ही टेस्ट द्यावी लागेल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

आज २५ लाख लोकांचे भविष्य, विद्यार्थ्यांचे भवितव्य यावर अवलंबून आहे. काही जण कोर्टात गेले आहेत. ही टेस्ट उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांना बडतर्फ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा विषय कोर्टात गेल्यामुळे एक डेडलॉक निर्माण झाला आहे. हे सर्व शिक्षक आपल्या-आपल्या स्थानिक भागात आवश्यक टेस्ट पास होऊन शिक्षक बनले आहेत, असे माने यांनी सांगितले.

केंद्र सरकारने या शिक्षकांच्या बाजूने कोर्टात जावे. कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करून केंद्र सरकारने या शिक्षकांवर अन्याय होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी धैर्यशील माने यांनी केली. त्यामुळे आता माने यांच्या या मागणीची दखल केंद्र सरकार घेऊन शिक्षकांना दिलासा देणार का, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, टीईटीच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळासह विविध संघटनांनी राज्यात शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षण विभागाने आंदोलकांवर कारवाईचा इशारा दिला आहे. मात्र, आंदोलनावर शिक्षक संघटना अडून आहेत. शिक्षकांसोबत शिक्षकेत्तर कर्मचारीही आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT