PM Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : नरेंद्र मोदींना झाली 'शोले'तील मावशीची आठवण; राहुल गांधींना डिवचलं, 'डायलॉग' एकदा ऐकाच...

Parliament Session Live Lok Sabha Session President Speech Debate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली.

Rajanand More

New Delhi :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत विरोधकांच्या गदारोळातच काँग्रेस व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. त्यांना 'शोले' चित्रपटातील मावशीची आठवण झाली. या चित्रपटातील डायलॉगचा आधार घेत त्यांनी राहुल यांना डिवचलं.

काय म्हणाले मोदी?

काँग्रेसच्या घोषणाबाजीने शोले चित्रपटालाही मागे टाकले आहे. शोले चित्रपटातील ती मावशी तुम्हाला आठवत असेल. असे मौसीजी तिसरीबार ही तो हारे है, अरे मौसी पार्टी अभीभी सांसे तो ले रही है, असे मौसीजी तेरा राज्यों में शून्य सीटे आई है, पर हिरो तो है ना... असे डायलॉग मोदींनी सभागृहात बोलून दाखवले.

पराभवाला खोट्या विजयाच्या नशेत दाबू नका. प्रामाणिकपणे देशाच्या जनादेशाला समजण्याचा प्रयत्न करा. त्याचा स्वीकार करा, असा सल्लाही मोदींनी दिला. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये निवडणुका आहेत. मागील निवडणुकीत या राज्यांत आम्हाला जेवढी मते मिळाली होती. त्यापेक्षा जास्त मते यावेळी लोकसभा निवडणुकीत मिळाली आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे. जनतेचा आशिर्वाद आमच्यासोबत आहे, असे मोदी म्हणाले.

काँग्रेसचे शीर्षासन

काँग्रेसलाही विरोधात बसण्याचा जनादेश दिला आहे. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग तिसऱ्यांदा शंभरचा आकडा पार करता आलेला नाही. हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. चांगले झाले असते जर काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता. पण हे तर शीर्षासन करत आहेत. काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टीम हिंदूस्तानातील नागरिकांना भासवण्याचा प्रयत्न करत आहेत की, त्यांनी आम्हाला हरवले आहे, असा टोला मोदींनी लगावला.

राहुल गांधींना डिवचलं

मोदींनी यावेळी एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, 99 मार्क घेऊन एक मुल सगळीकडे दाखवत फिरत होतो. हे पाहून लोक शाबासकी देत होते. शिक्षक आल्यानंतर विचारले की, कशाची मिठाई वाटत आहात. याने 100 पैकी 99 मिळवले नाहीत तर 543 पैकी एवढे गुण मिळवले आहेत. या बालबुध्दीला कोण समजवणार की त्याने फेल होण्याचे वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे, असे सांगत मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT