PM Narendra Modi, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Narendra Modi : विरोधकांनी लोकसभेत केलेली मागणी मोदींनी राज्यसभेत पूर्ण केली!

Rajanand More

New Delhi : लोकसभेत मंगळवारी अभूतपुर्व गोंधळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संपूर्ण भाषणादरम्यान विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती. मणिपूरच्या मुद्यावर बोलण्याचा आग्रह विरोधकांकडून केला जात होता. पण पंतप्रधान त्यावर शेवटपर्यंत बोलले नाहीत, त्यामुळे विरोधकांची घोषणाबाजी सुरू होती.

पंतप्रधान मोदींचे बुधवारी राज्यसभेला संबोधित केले. आजतरी ते मणिपूरवर बोलणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, यावेळी सभागृहात विरोधक उपस्थित नव्हते. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांना बोलू न दिल्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.  

राज्यसभेत मणिपूरवर बोलताना मोदी म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसा कमी होत असून शांतता निर्माण होत आहे. जे लोक मणिपूरच्या आगीत तेल टाकत आहेत, त्यांनी एक दिवस मणिपूरची जनता नाकारेल, अशी टीका त्यांनी केली. यावेळी मोदींनी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली.

मागील अधिवेशनात मी मणिपूरबाबत सविस्तर चर्चा केली होती. आज पुन्हा सांगतोय, मणिपूरमधील स्थिती सामान्य करण्यासाठी सरकार प्रय़त्नशील आहे. तिथे जे काही घडले, त्यानंतर 11 हजार एफआयआर दाखल करण्यात आले. 500 हून अधिक लोकांना अटक केली आहे. हिंसेच्या घटना सातत्याने कमी होत आहेत. अनेक भागांत शाळा, महाविद्यालये सुरू आहेत, असे मोदींनी सांगितले.

मणिपूरमधील संघर्षाचा खूप मोठा इतिहास आहे. मणिपूरमध्ये याच कारणांमुळे दहा वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागल्याचे काँग्रेसने विसरू नये. हे आमच्या कार्यकाळात झालेले नाही. तरीही राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT