Delhi News: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी झाली. दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
संविधानावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये संसदेत संविधानावर चर्चा होण्याच्या आधीच राज्यसभेत गदारोळ झाला. धनखड आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात जोरदार शाब्दीक युद्ध रंगले.
धनखड खर्गेवर संतापले, ते खर्गेंना म्हणाले, "मी तुम्हाला खूपवेळ सहन केले. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. ते तुम्हाला सहन होत नाही का?" यावर खर्गेंना त्यांच्यावर पलटवार केला. " मी मजुराचा मुलगा आहे. तुम्ही माझा आदर करणार नसाल तर मी तुमचा आदर का करू? असा उलट प्रश्न त्यांनी सभापतींना केला.
सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. याविरोधात भाजप खासदार राधामोहन दास अग्रवाल यांनी विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे, त्यावरून गदारोळ सुरू झाला.
धनखड: मैं किसान का बेटा हूं...
खर्गे: मैं मजदूर का बेटा हूं...
धनखड: मैं झुकूंगा नहीं... मर जाऊंगा देश के लिए झुकूंगा नहीं
खर्गे: मैं मजदूर का बेटा हूं...
धनखड: मैं सभी को इज्जत देता हूं.. पर आप लोगों की भाषा देखिए.
खर्गे: हम आपकी तारीफ करने के लिए यहां नहीं आए हैं.
धनखड: देश को पता है कि आप किसकी तारीफ सुनना चाहते हैं. चौबीसों घंटे एक ही काम है कि किसान का बेटा यहां क्यों बैठा है? मेहरबानी करके कुछ सोचिए. मैंने आंखों से देखा है. पीड़ा महसूस कर रहा हूं. मैंने इज्जत देने में कोई कमी नहीं रखी.
खर्गे: आप मेरा सम्मान नहीं कर रहे तो मैं कैसे आपका सम्मान कर सकता हूं?
धनखड: मैंने सम्मान देने में कोई कमी नहीं रखी. मैं खड़गे जी आपकी इज्जत करता हूं लेकिन किसी भी हालत में कमजोर नहीं पड़ूंगा. सबकी सुनूंगा, पूरे दिन सुनूंगा पर कमजोर नहीं पड़ूंगा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.