Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Priyanka Gandhi : केरळची पारंपरिक कसावू साडी अन् हातात संविधान..! प्रियांका गांधींची लोकसभेतील पहिली 'एन्ट्री' चर्चेत

Priyanka Gandhi Lok Sabha Oath Historic Moment: प्रियांका गांधी यांनी गुरूवारी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे पहिल्यांदाच एकाचवेळी गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत असणार आहेत.

Rajanand More

New Delhi : काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. संसदीय राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत असणार आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरूवारी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आपल्या संसदीय राजकारणाची सुरूवात केली.

प्रियांका गांधी यांचे बंधू व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांच्या आई राज्यसभेच्या सदस्य सोनिया गांधी अनेक वर्षांपासून संसदेत आहेत. प्रियांका गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत पहिल्यांदात संसदेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एकाचवेळी गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत असतील.

पहिल्यांदाच संसदेत दाखल झालेल्या प्रियांका गांधी यांचा आजचा पहिला दिवस खास ठरला. त्या केरळमधील मतदारसंघाच्या सदस्य असल्याने त्यांनी केरळमधील प्रसिध्द कसावू साडी नेसली होती. ही साडी तेथील पारंपरिक पोशाख म्हणून ओळखला जातो. सोनिया गांधी आणि राहुल यांच्यासोबत त्या संसदेत पोहचल्या.

लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शपथ घेण्यासाठी प्रियांका गांधींचे नाव पुकारले. त्यानंतर काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस बहुतेक खासदारांनी हातात संविधान घेऊन सदस्यत्वाची शपथ घेतली होती. प्रियांका यांनीही हातात संविधान घेत हिंदीतून सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी राहुल गांधीही लोकसभेत उपस्थित होते.

प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रेक्षक गॅलरीत बसले होते. दरम्यान, प्रियांका आणि राहुल गांधी हे दोघे पहिल्यांदाच एकाचवेळी लोकसभेत काँग्रेसचा आवाज मजबूत करताना दिसणार आहेत. तर लोकसभेच्या सदस्य बनलेल्या प्रियांका या गांधी कुटुंबातील तिसऱ्या महिला सदस्य असणार आहेत. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT