Parliament Winter Session  Sarkarnaam
देश

Parliament Winter Session: निलंबनाच्या कारवाई विरोधात खासदार आक्रमक; संसदेच्या बाहेर काढला मोर्चा

Ganesh Thombare

Delhi News: संसदेचे हिवाळी अधिवेशन खासदारांच्या निलंबनामुळे चांगलंच गाजलं. लोकसभा आणि राज्यसभा मिळून विरोधी पक्षांच्या तब्बल 143 खासदारांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं. या कारवाईमुळे विरोधी पक्षातील खासदार आता आक्रमक झाले आहेत. 'इंडिया आघाडी'च्या खासदारांनी एकत्र येत संसद भवन परिसरात मोर्चा काढला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील सहभागी झाले होते.

"संसदेत खुसखोरीची घटना घडली, यावर सभागृहात चर्चा का होत नाही ? सरकारला प्रश्न विचारल्यामुळेच एवढ्या खासदारांना निलंबित करण्यात आलं. संसदेत घुसखोरी झाली, ते लोकं कुठून आले ? संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असतील तर त्यावर संसदेत चर्चा का नाही ? खासदारांचं संसदेतून निलंबन करणं ही गोष्ट चांगली नाही. मात्र, हे सर्व देशातील जनता पाहत आहे. देशाच्या इतिहासात असं कधीही झालं नव्हतं", असं शरद पवार म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'संसदेत नाही, तर कुठे बोलणार... ?'

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही माध्यमांशी संवाद साधत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "पक्षांच्या 143 खासदारांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं. या सरकारला संससदेचं कामकाज चालावं, असं वाटत नाही. संसदेत खुसखोरीची घटना घडली. मात्र, यावर गृहमंत्री अमित शाहांनी निवेदन दिलं नाही. या घटनेवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) संसदेत बोलले देखील नाही.

पंतप्रधान मोदी हे बाहेर वाराणसीत जाऊन बोलत आहेत. पण पण माझं त्यांना आवाहन आहे, बाहेर बोलण्यापेक्षा संसदेत या आणि बोला. संसदेत पंतप्रधान आणि गृहमंत्री उपस्थित नाहीत हे दुर्देवं आहे. खासदारांना निलंबित करण्यात आलं. मात्र, आम्ही संसदेत नाही तर मग कुठे बोलणार ?", असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मिमिक्रीवर पवार काय म्हणाले ?

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी जगदीप धनखड यांची मिमिक्री केली होती. यावरुन भाजपने विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर धनखड यांची मिमिक्री केली त्यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी व्हिडिओ काढला होता, यावर आता शरद पवारांनी प्रतिक्रिया देत हा विषय संसदेच्या बाहेरचा होता, असं म्हटलं.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT