Jacqueline Fernandez Sarkarnama
देश

Jacqueline Fernandez : दोनशे कोटी खंडणी प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला समन्स

Jacqueline Fernandez : सुकेश सध्या तुरुंगात आहे. जॅकलिन ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुकेशच्या संपर्कात असायची असे काही साक्षीदारांनी सांगितले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : दोनशे कोटी खंडणी प्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने (Delhi's Patiala House Court) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसला (Jacqueline Fernandez) समन्स (Summons) बजावला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. (Jacqueline Fernandez latest news)

ईडीनं दाखल केलेल्याआरोपपत्रानंतर तिला समन्स बजावला आहे, आरोपपत्रात जॅकलिन फर्नांडिसचे नाव असल्याने न्यायालयाने समन्समध्ये म्हटलं आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका होती हे जॅकलीन हिला न्यायालयाला सांगावे लागणार आहे.

सुकेश सध्या तुरुंगात आहे. जॅकलिन ही व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सुकेशच्या संपर्कात असायची असे काही साक्षीदारांनी सांगितले आहे. २१५ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने जॅकलीनचे नाव आरोपी म्हणून नोंदले आहे. तिच्याविरुद्ध आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. जॅकलिनने या गैरव्यवहारातील पैशाचा लाभ घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखर हा खंडणी वसूल करायचा.

दोन महागडे गिफ्ट जॅकलिनला दिल्याचे सुकेशने यापूर्वी मान्य केले आहे. सुकेशने जॅकलिननला दहा कोटी रुपयांचे गिफ्ट दिले होते. सुकेशच्याविरोधात ३२ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. अनेक राज्यांच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सीबीआय, ईडी, प्राप्तीकर खाते यासारख्या तपास संस्था देखील सुकेशचा तपास करत आहेत. १२ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांकडून तिची चौकशी होणार आहे. ईडीने कारवाई करत तिच्याकडून सात कोटीपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे.

श्रीलंकेची नागरिक असलेल्या जॅकलिनने २००९ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. ईडीने एप्रिलमध्ये तिचा सात कोटी २७ लाखांचा निधी जप्त केला होता आणि ‘पीएमएलए’च्या तरतुदींतर्गत रोख १५ लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर ‘ईडी’ने एका निवेदनात स्पष्ट केले होते, की सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांतून मिळालेल्या रकमेतून जॅकलिन फर्नाडिसला पाच कोटी ७१ लाखांच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT