Mohabbat Ki Dukan Vs Parivarwaad  Sarkarnama
देश

Patna 0pposition Meeting : पाटण्यात रंगलयं पोस्टर वॉर ; 'घराणेशाही' विरुद्ध 'मोहब्बत की दुकान'...

Mohabbat Ki Dukan Vs Parivarwaad: विरोधीपक्षाच्या नेत्यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Patna News : आगामी निवडणुकीत भाजपला सत्तेपासून अलिप्त ठेवण्यासाठी विरोधीपक्ष आज पाटण्यात एकत्र येत आहे. थोड्या वेळात विरोधी पक्षाच्या बैठकीला सुरवात होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या घरी बैठक सुरु होण्यापूर्वी राजकीय वातावरण तापलं आहे. पाटण्यात बॅनरबाजीस सुरवात झाली आहे.

विरोधीपक्षाचे नेते पाटण्यात येत असल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठीचे बॅनर लावले आहेत, भाजपने भष्ट्राचारी नेत्यांचे महासंमेलन असे बॅनर लावले आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने बॅनर लावले आहे. काँग्रेसकडून "मोहब्बत की दुकान" असा मजकूर लिहिलेले स्वागतचे बॅनर लावण्यात आले आहेत, तर विरोधीपक्षाच्या नेत्यांचे व्यंगचित्र लावण्यात आले आहे.

'मोहब्बत की दुकान' असे लिहिलेली आणि त्यावर राहुल गांधी यांचे मोठे छायाचित्र असलेली स्वागत कमान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. भाजप-विरोधीपक्षाचे बॅनर वॉर आज पाटण्याच्या रस्त्यावर दिसते आहे. या बॅनरवरुन देशातील राजकारणावरील मिश्किल टोल-टोमणे नागरिकांना अनुभवाला मिळत आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, जेडीयू, राजद आणि आपसह डझनहून अधिक पक्षांच्या नेत्यांची शुक्रवारी पाटणा येथे बैठक होणार आहे. बैठकीच्या पूर्वसंध्येला आपने काँग्रेससमोर दिल्लीतील अध्यादेशाला पाठिंबा देण्याची अट ठेवली. त्यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यावर बैठकीचे यजमान जदयूने बैठकीत केवळ २०२४ मधील रणनीतीवर चर्चा होईल, असे स्पष्ट केले.

विरोधकांच्या बैठकीत नेतृत्वावर कोणतीही चर्चा होणार नाही. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाटण्यात दाखल झाल्या. त्यांनी राजद प्रमुख लालूप्रसाद यांची भेट घेतली आणि त्यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, फारुक अब्दुल्ला, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन शुक्रवारी पाटणा येथे पोहोचले आहेत.

आजच्या बैठकीवर 'सामना'मधून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. "पाटण्याच्या बैठकीत थोडे चिंतन-मंथन झाले आणि वज्रमूठ उगारली तर 2024ला मोदी यांना ‘झोला’ खांद्यास लटकवून जावेच लागेल. पाटण्यात त्यासाठीच एकीचा नारा द्यायचा आहे," अशा शब्दात ठाकरे गटाने भाजपावर टीका केली आहे. देशभक्त पक्षांच्या आजच्या पहिल्याच बैठकीसाठी पाटण्याची भूमी निवडली हे योग्यच झाले, असे ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

"पाटण्यातील हा ‘मेळा’ म्हणजे ‘देश बचावो’ आंदोलन आहे. देशातील जनतेची मने पुरती मेलेली नाहीत, हे कर्नाटक विधानसभेच्या निकालांनी स्पष्ट केले. लोकांनी कर्नाटकात जो सुज्ञपणा दाखवला तो संपूर्ण देशात दाखवला पाहिजे व त्यासाठी आधी अठरापगड पक्षांनी ऐक्याची मोट बांधली पाहिजे. पाटण्याच्या पहिल्याच बैठकीत फार मोठ्या चमत्काराची आशा धरता येणार नाही, पण सुरुवात होत आहे व अनेक तोंडे एकत्र बसून विचार करतील, हे महत्त्वाचे असल्याचे अग्रलेखात म्हटलं आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT