Pema Khandu, Chandrababu Naidu, Narendra Modi, Mohan Majhi, Premsingh Tamang
Pema Khandu, Chandrababu Naidu, Narendra Modi, Mohan Majhi, Premsingh Tamang Sarkarnama
देश

Oath Ceremony : अखेर आज शपथविधीचा सिलसिला थांबला! पाच दिवस, पाच ठिकाणं, पाच ऐतिहासिक क्षण...

Rajanand More

New Delhi : देशात लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेला शपथविधीचा सिलसिला अखेर गुरूवारी संपला. अरुणाचलच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे पेमा खांडू यांनी शपथ घेतली. राज्यात सलग तिसऱ्यांदा भाजपचे सरकार आले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पेमा खांडू यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली होती. पक्षाला 60 पैकी तब्बल 46 जागा मिळाल्या आहेत. खांडू हे मागील सकारचेही नेतृत्व करत होते. भाजपने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.

दरम्यान, देशात लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. तीन राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आली असून केंद्रातही एनडीए सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवत इतिहास घडवला आहे. निवडणुकांनंतर देशात शपथविधीचे सत्र सुरू झाले होते. गुरूवारी खांडू यांच्या शपथेनंतर हा सिलसिला थांबला.

नरेंद्र मोदींचा शपथविधी

रविवारी (ता. 9) दिल्लीत नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर 71 मंत्र्यांचाही शपथविधी झाला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले असून सरकारचे कामही सुरू झाले आहे.

प्रेमसिंग तमांग यांनी घडवला इतिहास

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे प्रमुख प्रेमसिंग तमांग यांनी सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्रिपदी सोमवारी (ता. 10) शपथ घेतली. त्यांच्यासोब 11 मंत्र्यांचाही शपथविधी झाला. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 32 पैकी 31 जागा मिळाल्या आहेत.

चंद्राबाबूंचा करिष्मा

चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (ता. 12) आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री, एनडीएतील नेते उपस्थित होते. नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या तेलुगू देसम पक्षाने जगनमोहन रेड्डी यांची सत्ता उलथून टाकली आहे.

मोहन माझींना सुखद धक्का

भाजपने ओडिशाच्या मुख्यमंत्रिपदी मोहन माझी यांची निवड करत त्यांना सुखद धक्का दिला. माझी यांनीही बुधवारी पंतप्रधानांच्या उपस्थितीत पदाची शपथ घेतली. ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक तब्बल 24 वर्षे मुख्यमंत्री होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT