Vladimir Putin
Vladimir Putin 
देश

रशिया युक्रेन युद्ध काळात पुतीन यांचे एअर होस्टेससोबतचे फोटो व्हायरल

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या फोटोंमध्ये ते रशियन एअर होस्टेस आणि पायलटसोबत दिसत आहे. एका टेबलाभोवती अनेक महिला खुर्च्यांवर बसल्या आहेत, त्यांच्यासोबत राष्ट्राध्यक्ष पुतिन हे देखील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. (Russia-ukraine war latest news update)

nypost.com च्या वृत्तानुसार, ही छायाचित्रे शनिवारची (5 मार्च) आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एरोफ्लॉट एअरलाइनच्या एअर होस्टेस आणि पायलटसोबत बोलताना दिसत आहेत. पुतिन पीजेएससी एरोफ्लॉटच्या एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरला भेट देण्यासाठी गेले होते. यादरम्यान ते रशियन एअरलाइन्सच्या महिला फ्लाइट क्रूसोबत फोटो काढताना पोज देताना दिसत आहेत. या भेटीदरम्यान त्यांनी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही बैठक घेतली.

ABC रिपोर्टर पॅट्रिक रीव्हेल यांनीही अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट करत, 'व्लादिमीर पुतिन आता रशियाच्या एअर होस्टेसला युक्रेन हल्ल्याचे कारण समजावून सांगत नसतील ना.' असे या फोटोजवर कॅप्शनही दिले आहे.

दरम्यान, एका मुलाखतीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियावर निर्बंध घालणाऱ्या देशांना इशारा दिला आहे. ' पाश्चिमात्य देशांचे रशियावरील निर्बंध हे युद्धाच्या घोषणेसारखे आहेत. जर युक्रेनने असेच वागणे सुरू ठेवले तर एक दिवस युक्रेन त्यांच्या राज्याचे राज्यत्व गमावून बसेल. युक्रेनमध्ये नो-फ्लाय झोन लागू करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धात प्रवेश करण्यासारखा असेल,

विशेष म्हणजे युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे पुतीन यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. गेल्या अकरा दिवसांपासून सुरु असलेले हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजपर्यंत या युद्धावर कोणताही तोडगा निघालेला नाही. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची एअर होस्टेससोबतची छायाचित्रे सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT