PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Awas Yojana : घर दिलं, पण त्यासाठी 30 हजार घेतले; खासदारांसमोरच महिलेच्या आरोपाने खळबळ

Rajanand More

Uttar Pradesh News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शुक्रवारी सोलापुरात 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. पण या योजनेतून घर मिळवण्यासाठी लाच द्यावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात असून एका महिलेने घरासाठी 30 हजार घेतल्याचे भाजप खासदारांसमोर सांगितल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायू येथे विकसित भारत संकल्प यात्रे (Vikasit Bharat Sankalp Yatra) दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये भाजपचे (BJP) खासदार धर्मेंद कश्यप (Dharmendra Kashyap) आणि एक महिलेतील संवाद आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रवक्ते अतुल लोंढे (Atul londhe) यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या या महिलेला कश्यप यांच्या हस्ते घराची चावी देण्यात आली.

चावी देत असताना कश्यप यांनी संबंधित ज्येष्ठ महिलेला घरासाठी कुणी पैसे तर घेतले नाहीत ना? अशी विचारणा केली. त्यावर होय 30 हजार रुपये घेतले, असे उत्तर त्या महिलेने दिले. त्यानंतर खासदारांसह उपस्थितांना त्याचे हसू आले. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदारांनी हे खूप गंभीर असल्याचे सांगत चौकशी करण्याचे आदेश दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बदायूचे जिल्हाधिकारी मनोजकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या व्हिडीओवरून आता राजकारण तापलं आहे. समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराने टोक गाठल्याची टीका केली.

यादव म्हणाले, भाजपचे नेते म्हणत होते की, खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही. पण संपूर्ण यंत्रणेतील लोक खात आहेत आणि भाजपच्या नेत्यांनाही देत आहेत. महिला माईकवर पैसे घेतल्याचे सांगत असेल तर त्याची चौकशी कसली करताय. संबंधितांवर तातडीने कारवाई करायला हवी. प्रत्येक लाभार्थ्यासोबत असेच होत असल्याचा दावाही यादव यांनी केला आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT