Indian armed forces hit terror targets in Pakistan 
देश

Operation Sindoor : मोदींचा पाकिस्तानला दणका; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानमध्ये नुसता गोंधळ

India hits Pakistan : भारतीय हवाई दलाने केले मध्यरात्री नऊ ठिकाणांवर हल्ले; पाकिस्तानमध्ये खळबळ

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अशा कृत्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय हवाई दलाने धडा शिकवला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारताने एअर स्ट्राईक्स केले. यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

गेले दोन आठवडे भारताने पाकिस्तानवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. याशिवाय सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यापर्यंत विविध उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. पण लष्करी कारवाई सुरु केली नव्हती. यामुळे पाकिस्तानही सतत भीतीच्या छायेखालीच होता.

अखेर मध्यरात्री दीडच्या सुमारास भारताने हवाई हल्ले करत कठोर कारवाईला सुरुवात केली. यापूर्वी भारताला प्रत्युत्तर देण्याच्या वल्गना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहवालपूर येथे भारताच्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तेथील रुग्णालयांमध्ये अनागोंदी माजल्याच्याही बातम्या समोर येत आहेत.

अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही ट्विट करत भारताला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT