PM Modi C-Voter: सी-वोटर या राजकीय सर्व्हेक्षण करणाऱ्या कंपनीनं केलेल्या एका महत्वाच्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तरुणांच्या पहिल्या पसंतीचे नेते म्हणून पसंती दर्शवल्याचं म्हटलं आहे. यामध्ये लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची लोकप्रियता देखील जाणून घेण्यात आली आहे. जंतर-मंतरवर झालेल्या जेनझींच्या आंदोलनानंतर देशातील तरुणांचा मूड जाणून घेण्यासाठी हा सर्व्हे केल्याचं सी-व्होटरनं म्हटलं आहे.
सी-व्होटरनं विचारलं की, शिक्षण सुधारणेसाठी सरकारची काय प्राथमिकता असायला हवी? याला उत्तर देताा २७.२ टक्के लोकांचं उत्तर होतं 'मंत्र्यांचा राजीनामा'. 31.7 टक्के लोकांनी उत्तर दिलं की, पेपरलीक विरोधात कडक कायदा असावा, ११.९ टक्के लोकांनी एनटीएत महत्वाचे बदल करण्याची मागणी केली.१६.७ टक्के लोकांनी शिक्षण सुधारणेसाठी तज्ज्ञांची समिती तयार करायला हवी असं म्हटलं, ६.९ टक्के लोकांनी अन्य सुधारणा तर ५.७ टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला. तर १६.१ टक्के लोकांनी आम्हाला काहीही माहिती अशी उत्तरं दिली. संसदेत यावरही समाधानकारक चर्चा झाली, तर २५,३९ टक्के लोकांनी माहिती नाही हा पर्याय निवडला.
सर्व्हमध्ये तीन प्रश्न विचारण्यात आले, यापैकी पहिला प्रश्न विचारला गेला की, तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रयी नेता कोण आहे? यावर ३९.८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हटलं आहे. तर राहुल गांधी या तरुणांसाठी २७.९ टक्क्यांवर आहेत. तर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना १२.६ टक्क्यांनी सर्वाधिक लोकप्रिया नेते म्हणतात.
मोदी सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर पेपर लीक कायद्यातही सुधारण केली आहे. तसंच अधिक सुधारणा व्हाव्यात यासाठी तज्ज्ञांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. पण तरीही जास्तीत जास्त लोक सरकारच्या या कार्यावाहीवर नाराज आहेत. यासंदर्भात पेपरलीक रोखण्यासाठी सकरारनं उचललेल्या पावलांवर तुम्ही खूष आहात का? असा प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना ३३.२ टक्के लोकांनी याचं होय असं उत्तर दिलं, त्याचबरोब ३३.२ टक्के लोकांनी म्हटलं की, मी उत्तर दिलं पण ५०.७ टक्के लोकांनी नाहीचा पर्यय घेतला. तर ५०.९७ टक्के लोकांनी नाही हा पर्याय स्विकारला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.