Narendra Modi सरकारनामा
देश

'टाळी, थाळी'च्या प्रश्नांवर देशाने एकतेमधून उत्तर दिले, मोदींची विरोधकांना चपराक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पुर्ण केल्याच्या पार्श्वभुमीवर देशाला संबोधित केले.

ऋषीकेश नळगुणे

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पुर्ण केल्याच्या पार्श्वभुमीवर देशाला संबोधित केले. “कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः या संस्कृत श्लोकाने त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मोदी म्हणाले, भारताने १०० कोटी कोरोना लसीकरणाचे कठीण पण अवघड लक्ष्य पुर्ण केले. या पाठीमागे देशातील १३० कोटी जनतेचे सहकार्य आणि कर्तव्यशक्ती आहे. यासाठी सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. १०० कोटी लसीकरण ही फक्त संख्या नाही, तर ते देशातील जनतेच्या सामर्थ्याचे प्रतिबंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे. असेही मोदी म्हणाले.

मोदी पुढे म्हणाले, ज्या वेगाने आपण १०० कोटींचा टप्पा पूर्ण केला, त्याचे जगभरातून कौतुक करण्यात येत आहे. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आले. यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. जे बड्या देशांना जमलं नाही ते भारताने करुन दाखवले, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना इतर देशांशी करत आहेत. कौतुक देखील केले जात आहे. पण या विश्लेषणात एक गोष्ट वगळली आहे, ती म्हणजे भारताने कुठून सुरुवात केली हे बघणे गरजेचे आहे. कारण जगातील इतर देशांसाठी लस शोधण्यात, संशोधन करण्यात मास्टर होते. भारत मात्र या देशांकडून बनवलेल्या लसीवरच अवलंबून होता. जेव्हा ही महामारी आली, तेव्हा भारतावर प्रश्न निर्माण होऊ लागले की भारत त्याच्याशी लढा देऊ शकेल का, दुसऱ्या देशातून लस आणण्यासाठी पैसे कुठून आणेल, भारताला लस मिळेल की नाही, भारत लसीकरण करू शकेल का? अनेक प्रश्न होते, पण आज हा १०० कोटी डोस प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत आहे. भारताने आपल्या नागरिकांना आज स्वत:च्या हिंमतीवर १०० कोटी लसीचे डोस दिले आहेत आणि तेही मोफत, असे पंतप्रधांनी म्हटले आहे.

भारताबद्दल सुरुवातीला म्हंटले जात होते की इथे हे कोरोनाबाबतचे नियम, इतका संयम, इतकी शिस्त कशी पाळली जाईल. पण भारताने सबका साथ म्हणत आपल्या एकतेचे दर्शन दाखवले. आजाराच्या सुरुवातीला टाळ्या, थाळ्या वाजवल्या. दिवे लावले. यावर अनेकांनी आजार यामुळे जाईल का असे म्हणत हेटाळणी केली. पण यातुनच भारताची एकतेची ताकद दिसुन आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT