पूर्वोत्तर भारतच्या इतिहासात पहिल्यादांच आज 14 फरवरी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये हायवेवर आपत्कालीन लँडिंग केले. पारंपारिक विमानतळावर उतरण्याऐवजी मोदी प्रवास करीत असलेले विमान आज चक्क महामार्गावर उतरले.
मोरान येथील NH-127 म्हणून ओळखला जाणार हा राष्ट्रीय महामार्ग Emergency Landing Facility (ELF)साठी विकसित केला जात आहे. या महामार्गावर 4.2 किलोमीटर अंतर हे इमरजैसी लँडिगसाठी खास डिझाईन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक वेळेस लडावू आणि लष्कराचे विमाने या राष्ट्रीय महामार्गावर उतरु शकतील, अशी व्यवस्था येथे करण्यात आली आहे. आज मोदी यांच्या उपस्थितीत याचे उद्धघाटन झाले. त्यासाठी स्वत: मोदी यांनी विमानातून या महामार्गावर लँडिग केले.
राफेल, आणि अत्याधुनिक फायटर विमानाचे लँडिगचे प्रात्यक्षिक मोदींच्या उपस्थित झाले. सुमारे 30 ते 40 मिनिटे या विमानांचा एरियल डेमो करण्यात आला. त्याचे थेट प्रक्षेपक करण्यात आले.
मोरान येथील महामार्गावरील ELF ही सुविधा भारतातील पहिली अशी सुविधा ठरली आहे. चीनच्या सीमेजवळ असलेल्या या महामार्गावरील ELF ही सुविधा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे महत्वपूर्ण मानली जाते. युद्धजन्य परिस्थितीमध्ये Emergency Landing Facility (ELF)चे योगदान महत्वपूर्ण ठरले, असा दावा यातील तज्ञ्य़ व्यक्तींनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.