PM Modi Maldives Sarkarnama
देश

India Maldives : भारतावरील टीका भोवली; मालदीवच्या महिला मंत्र्यासह तिघांवर निलंबनाची कारवाई

Maldives Government Suspended Minister : भारत आणि पंतप्रधान मोदींवरील टीका मालदीवच्या मंत्र्यांना भोवली...

Sachin Fulpagare

India Maldives Relations : पंतप्रधान मोदी आणि भारतावर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या मालदीवच्या महिला मंत्र्यावर अखेर कारवाई झाली आहे. मंत्री मरियम शिउना, मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांना निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना भारतावरील टीका भोवली आहे.

मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम खलील यांनी याबाबत माहिती दिली. वादग्रस्त टीका करणाऱ्या तिन्ही मंत्र्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद सोलिह यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर मालदीव सरकारमधील मंत्र्यांकडून वापरण्यात आलेल्या घृणास्पद भाषेचा निषेध करतो. भारत कायम मालदीवचा एक चांगला मित्र राहिला आहे. अशा प्रकारच्या कडक शब्दांत टीका करून दोन्ही देशातील कित्येक दशकांच्या मैत्रिच्या संबंधांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टीका केली होती. हा मुद्दा भारत सरकारने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकार समोर उपस्थित केला होता. मालेतील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्याच्या टीकेवर तीव्र आक्षेप नोंदवला. भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर मालदीव सरकारने निवेदन जारी करत भूमिका स्पष्ट केली. ते मंत्र्यांचे वैयक्तीक मत असल्याचे मालदीव सरकारने म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT