Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi Vs INDIA : 'इंडिया'च्या रणनीतीला पंतप्रधान मोदींचे तोडीस तोड उत्तर; पाठोपाठ बैठकांचा धडाका

Maharashtra NDA MP : ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील खासदारांसोबत चर्चा होणार आहे

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : भाजपविरोधकांनी 'इंडिया' नावाखाली एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पाटणा, बेंगळुरूनंतर आता मुंबई येथे बैठक होणार आहे. इंडियाची सुरू असलेल्या लोकसभेच्या रणनीतीला पंतप्रधान मोदींनीही तोडीस तोड उत्तर देण्याचे ठरवले आहे. त्यांनीही देशभरातील भाजपसह मित्र पक्षातील नेत्यांच्या बैठकांचा धडाका लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे लोकसभा निडवणुकीपूर्वीच 'इंडिया' आणि 'एनडीए'मध्ये चुरस वाढून राजकीय माहोल गरम होणार आहे. (Latest Political News)

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विविध राज्याच्या एकत्रित अशा ११ बैठकांचे आयोजन केले आहे. यातील गुरुवारी पाचवी आणि सहावी बैठक पार पडणार आहेत. यावेळी 'एनडीए' खासदारांसोबत पंतप्रधान मोदी लोकसभेच्या निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीमध्ये दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीरमधील 'एनडीए'चे खासदार सहभागी होणार आहेत. येत्या ८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील खासदारांसोबत चर्चा होणार आहे.

भाजपने देशातील ३०० हून अधिक जागांवर कमळ फुलवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अनुषंगाने 'इंडिया'ला मात देण्यासाठी मोदी 'एनडीए'च्या खासदारांना लोकसभा निवडणुकीतील विजयाचा कानमंत्र देत आहेत. खासदारांनी गावे आणि शहरांमध्ये फिरून लोकांच्या समस्या ऐकून घेण्याच्या सूचना मोदींनी केल्या होत्या. या बैठकांचा ३१ जुलैपासून सुरू झालेला धडाका १० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहाही साथ देत आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT