India Europe partnership : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर असून त्यांनी स्वीडनमध्ये झालेल्या ‘युरोपियन उद्योगांच्या गोलमेज बैठकीला (ERT) संबोधित केले. या बैठकीत त्यांनी सध्याच्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या आणि अनिश्चितता असलेल्या जागतिक वातावरणात विश्वासू भागीदारीच्या आवश्यकतेवर भर देताना युरोपातील उद्योगांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले.
व्हॉल्वो समूहाने (Volvo Group) रविवारी आयोजित केलेल्या या संवाद सत्रात स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन, युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा महामहीम उर्सुला वॉन डेर लेयेन, युरोपियन उद्योगांचे वरिष्ठ नेते आणि आघाडीच्या युरोपियन आणि भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत-युरोपीय संघातील संबंधित अधिकृ दृढ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
‘भारत-युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराच्या’ वाटाघाटी यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदींनी या कराराचे वर्णन एक क्रांतिकारी आर्थिक भागीदारी असा केला. या करारामुळे व्यापार, तंत्रज्ञान, उत्पादन, सेवा आणि लवचिक पुरवठा साखळी या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होतील, असे सांगितले. ‘भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर’ (IMEC) सारखे कनेक्टिव्हिटी प्रकल्प भारत-युरोप व्यवसाय भागीदारीला अधिक मजबूत करतील, असेही ते म्हणाले.
गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादनासाठी भारत जगातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी भारताच्या “डिझाईन फॉर इंडिया, मेक इन इंडिया आणि एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया” या संकल्पनेचा पुनरुच्चार केला आणि युरोपियन कंपन्यांना टेलिकॉम आणि डिजिटल पायाभूत सुविधा; एआय (AI), सेमीकंडक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि डीप टेक मॅन्युफॅक्चरिंग; हरित संक्रमण आणि स्वच्छ ऊर्जा; पायाभूत सुविधा, गतिशीलता आणि शहरी परिवर्तन; तसेच आरोग्य सेवा आणि लाईफ सायन्सेस यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारताचे भागीदार होण्यासाठी आमंत्रित केले.
लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी भारत आणि युरोप यांनी एकत्र काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि युरोप यांच्यातील प्रतिभेची देवाणघेवाण, शिक्षण आणि कौशल्य भागीदारीच्या महत्त्वावरही भर दिला. ‘भारत-युरोप सीईओ गोलमेज बैठक’ दरवर्षी आयोजित करण्याची आणि ‘ERT’ मध्ये एक ‘इंडिया डेस्क’ (India Desk) तयार करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.