Narendra Modi  Gujrat
देश

आता PM मोदींचे मिशन गुजरात; ४ लाखांची गर्दी जमवत फुंकलं रणशिंग

PM Narendra Modi | Gujrat Election : या वर्षांखेर होणार गुजरात विधानसभेच्या निवडणुका

सरकारनामा ब्युरो

गांधीनगर : काल उत्तर प्रदेशसह गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब विधानसभेचे निकाल लागले. या निकालांमध्ये पंजाब वगळता ४ राज्यांत भाजपचा डंका वाजला आहे. या चारही राज्यांमध्ये भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. या विजयाचे श्रेय भाजपच्या सर्वच नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिले आहे. दरम्यना चार राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या वर्षांच्या अखेर होणार असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसीय गुजरात दौऱ्यासाठी पोहचले आहेत. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी सकाळी ११ वाजता अहमदाबाद विमानतळ ते गुजरात भाजपचे मुख्यालय असा रोडशो केला. भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दावा केला की पंतप्रधान मोदींचे स्वागतासाठी या रोड शो दरम्यान तब्बल ४ लाख भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आज स्थानिक स्वराज्य संस्थेमधील १ लाख सदस्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते अहमदाबाद मैदानावर 'खेल महाकुंभ'चेही उद्घाटन करणार आहेत. शिवाय राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या दिक्षांत समारोहला ते प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित राहणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT