PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi News : गुलामीची मानसिकता..! अखेर मोदींनी संधी साधली, विरोधकांवर चढवला हल्ला

Mahakumbh 2025 BJP Politics Opposition Leaders News : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते.

Rajanand More

Madhya Pradesh News : मागील काही दिवसांत विरोधी पक्षांतील अनेक नेत्यांनी महाकुंभवरून उत्तर प्रदेशातील योगी सरकारसह केंद्रातील मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला होता. काही नेत्यांच्या विधानावरून वादही निर्माण झाला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी विरोधकांची मानसिकता गुलामगिरीची असल्याचे म्हटले. त्यांनी महाकुंभवरून पहिल्यांदाच विरोधकांचा समाचार घेतला.

बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले. ते म्हणाले, मागील काही दिवसांपासून धर्माची खिल्ली उडवणाऱ्या नेत्यांचा गट आपण पाहत आहोत. ते लोकांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा परकीय शक्ती देशाला आणि धर्माला कमकुवत करण्यासाठी या लोकांची मदत करत आहेत.

हिंदू धर्माचा तिरस्कार करणारे लोक काही काळच राहतात. गुलामीची मानसिकता असलेले हे लोक आपल्या श्रध्देवर, मंदिर, धर्म, संस्कृती तत्वांवर हल्ला करतच असतात. आपले उत्सव, परंपरांची ते निंदा करतात. नैसर्गिकरीत्या पुरोगामी असलेल्या धर्म आणि संस्कृतीवर ते बेधडक हल्ला चढवत आहेत. समाजाचे विभाजन करत असून आपली एकदा भंग करण्याचा त्यांचा अजेंडा असल्याची टीका मोदींनी केली.

कार्यक्रमात मोदींनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे कौतुक केले. धीरेंद्र शास्त्री हे लोकांना एकतेचे मंत्र पटवून देण्यासाठी जागृती करत आहेत. आता ते मानवता आणि समाजाच्या भल्यासाठी मोठे काम करत आहेत. कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याचा त्यांचा प्लॅन आहे. म्हणजेच बागेश्वर धाममध्ये तुम्हाला भजन, अन्न आणि निरोगी आयुष्यही लाभणार आहे, असे मोदी म्हणाले.

विरोधकांकडून महाकुंभवर टीका

मागील काही दिवसांत विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी महाकुंभवरून टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभचा उल्लेख मृत्यू कुंभ असा केला होता. तर लालू प्रसाद यादव यांनी अर्थहीन असे म्हटले होते. खासदार जया बच्चन यांनीही महाकुंभदरम्यान नदीतील पाणी सर्वाधिक प्रदुषित असल्याचा दावा केला होता. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी कुंभमध्ये डुबकी घेऊन कुणाचे पोट भरणार आहे का, असे विधान केले होते.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT