SPG sarkarnama
देश

अशी असते पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा ; रोज होतो पावणे दोन कोटींचा खर्च!

अलीकडेच मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यात आणखी एका नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत.

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंजाबमधील गुरुदासपूर जवळील एका पुलावर ४ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे अडकून पडल्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. ही घटना म्हणजे सुरक्षेतील गंभीर चूक मानली जात आहे. पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था कशी असते, हे जाणून घेऊया.

पंतप्रधानांच्या (PM Modi)दैाऱ्याचे नियोजन हे एसपीजी, आय़बी, राज्य सरकारचे अधिकारी मिळून करतात. संसदेने या संदर्भात कायदा देखील केला आहे, ज्यामध्ये केवळ देशाच्या पंतप्रधानांनाच SPG संरक्षण दिले जाईल अशी तरतूद करण्यात आली होती. पंतप्रधानपद सोडल्यानंतर 5 वर्षे एसपीजी सुरक्षा असेल आणि नंतर ती काढण्यात येईल.

नरेंद्र मोदी यांना विशेष संरक्षण गट (SPG) संरक्षण देण्यात आलं आहे. अलीकडेच मोदी (PM Modi) यांच्या ताफ्यात आणखी एका नव्या वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही अभेद्य किल्ल्याप्रमाणे या कारमध्ये अनेक सुरक्षा व्यवस्था आहेत. शत्रूचा प्रत्येक कट हाणून पाडण्यास सक्षम आहेत. या गाडीची किंमत सुमारे 12 कोटी रुपये आहे.

spg

अशी असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था

  • केंद्रीय गृहमंत्रालय पंतप्रधानच्या दौऱ्यापूर्वीच त्या त्या संबंधित राज्यांना ब्ल्यू बुकलेट पाठविते. त्यानुसार पंतप्रधानच्या सुरक्षेची फुलप्रुफ व्यवस्था केली जात असते.

  • दौऱ्यापूर्वी १५ दिवस अगोदर राज्य सरकार, संबंधित अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासन आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजी एकत्रित पणे सुरक्षा व्यवस्थेची आखणी करतात.

  • पंतप्रधान ज्या मार्गावरून जाणार तेथे ७ तास अगोदर सुरक्षा रिहर्सल घेतली जाते. कधी कधी दोन तीन तास अगोदर सुद्धा मार्ग बदलला जातो.

  • स्थानिक प्रशासन प्रथम मार्ग, पर्यायी मार्ग ठरविते आणि एसपीजी त्याला अंतिम स्वरूप देते.

  • स्थानिक पोलीस, गुप्तचर पंतप्रधान ताफ्यापासून ५० ते १०० मीटर अंतरावर असतात आणि प्रत्येक क्षणाची माहिती कंट्रोल रूमला देत असतात.

  • एसपीजी त्वरित त्यानुसार निर्णय घेत असतात. ऐनवेळी मार्ग बदलण्याची वेळ आलीच तर पूर्वी जे पर्यायी मार्ग ठरविलेले असतात त्यातील एक निवडला जातो.

  • ताफा कुठे पर्यंत पोहोचला याची माहिती वेळोवेळी कंट्रोल रूम कडे जात असते. सर्वात पुढे पायलट कार असते जी पुढचा रस्ता योग्य असल्याचे संदेश कंट्रोलरुमल देते. पंतप्रधानांच्या दोन्ही बाजूला एसपीजीचे सदस्य असतात.

  • वाहनातील कमांडो अतिशय सतर्क असतात. हे तेच कमांडो आहेत जे सूटबूट, काळा चष्मा लावून मोदींना घेरून असतात. गरज पडल्यास ते त्यांच्याकडच्या अत्याधुनिक हत्यारांनी क्षणात शत्रूला यमसदनी धाडू शकतात

कमांडोकडे अत्याधुनिक शस्त्रे

भारताच्या पंतप्रधानांची सुरक्षा करणाऱ्या या एसपीजी कमांडो कडे जगातील सर्वात उत्तम अत्याधुनिक शस्त्रे आहेत. या कमांडोकडे कम्युनिकेशन साठी ईअरप्लग, सूटच्या आत बुलेटप्रुफ जाकीट, टॅक्टीकल काळा चष्मा, बेल्जियम येथे बनलेल्या एफएन २००० अस़ॉल्ट रायफल, एफएन पी ९० सबमशीन गण, एफएन ५-७ हॅँडगन, याशिवाय ऑस्ट्रिया येथे बनलेली ग्लेक १७ आणि १९ हँडगन असतेच शिवाय कॉम्बॅट शूज, बुलेट प्रुफ नी पॅड कमांडो वापरतात.

१९८५ मध्ये एसपीजीची स्थापना

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाल्यानंतर १९८५ मध्ये एसपीजीची स्थापना केली गेली. सध्या या विभागात ३ हजार जवान, अधिकारी आहेत. एसपीजीचे बजेट ६०० कोटींचे आहे. याचा अर्थ पंतप्रधानांच्या सुरक्षेवर रोज होणारा खर्च साधारण १.६२ कोटी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT