Narendra Modi Visits Hunar Hatt in Delhi
Narendra Modi Visits Hunar Hatt in Delhi 
देश

मोंदींनी घेतला मातीच्या भांड्यातला चहा; पैसेही स्वतःच भरले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या वतीने इंडिया गेटजवळ आयोजित हुनर हट येथे आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. मोदी यांनी हुनर हट येथे लिट्टी-चोखा पदार्थाचा आस्वाद घेतला तसेच मातीच्या भांड्यातील चहा देखील घेतला. विशेष म्हणजे चहाचे पैसे त्यांनीच भरले.

आज दुपारी एक ते दीडच्या सुमारास इंडिया गेटजवळील राजपथलगत हुनर हटला पंतप्रधान अचानक पोचले . त्याठिकाणी ते सुमारे ५० मिनिटे होते. यावेळी त्यांनी हुनर हटमधील विविध स्टॉलला भेट देऊन माहिती घेतली. पंतप्रधानांची भेट निश्‍चित नव्हती. मात्र आज दुपारी अचानक त्यांनी हुनर हटला भेट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयोजकांची धावपळ उडाली. पंतप्रधान आल्याचे समजताच अल्पसंख्यांक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हुनर हटला दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. 

हुनर हट येथील एका स्टॉलवर लिट्टी चोखा पदार्थाचा आस्वाद घेतला. यासाठी त्यांनी १२० रुपये भरले. त्यानंतर त्यांनी मातीच्या भांड्यातील चहा देखील घेतला. तेथे त्यांनी दोन चहाची ऑर्डर दिली. एक चहा स्वत: घेतला आणि दुसरा चहा नक्वी यांना दिला. पंतप्रधान आल्याचे पाहून नागरिकांची गर्दी झाली. यावेळी ‘मोदी-मोदी अशी घोषणाबाजी झाली.

काहींनी त्यांच्यासमवेत सेल्फी काढले. यापूर्वी राष्ट्रपती रामानथ कोविंद यांनी हुनार हटला भेट दिली आहे. ‘कौशल को काम’ या संकल्पनवेर हुनार हटचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत हुनार हट चालणार आहे. यात महिला उद्योजगांची संख्या अधिक आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT