Kapil Patil, Raosaheb Danve, Bharati Pawar  Sarkarnama
देश

Lok Sabha Election Resullt 2024 : सत्ता आली पण... महाराष्ट्रातील तिघांसह मोदींच्या 18 मंत्र्यांना घरचा रस्ता

Sachin Waghmare

Lok Sabha Election Resullt 2024 News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी गेल्या जवळपास अडीच महिन्यापासून सुरु होती. मंगळवारी मतमोजणी झाल्यानंतर पुन्हा एकदा निकालावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करीत आहेत.

तिसऱ्यांदा विजय मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेचा सोपान राखला असला तरी दुसरीकडे या निवडणुकीत केंद्रीय मंत्रीमंडळातील सुमारे 18 मंत्र्यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामध्ये काही जणांचा पराभव हा मोठया फरकाने झाला असल्याने त्यांच्यावर आता येत्या काळात आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. (Lok Sabha Election Resullt 2024)

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, स्मृती इराणी, अजय कुमार मिश्रा, सुभाष सरकार, अर्जुन मुंडा, कैलास चौधरी, एल मुरुगन, निसिथ प्रामाणिक, संजीव बल्यान, कौशल किशोर, भगवंत खुबा, व्ही. मुरलीधरन, महेंद्रनाथ पांडे, साध्वी निरंजन ज्योती, भानु प्रताप सिंग वर्मा हे मंत्री पराभूत झाले आहेत.

राज्यातील 'या' तीन मंत्र्यांचा समावेश

केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले राज्यातील तीन मंत्री पराभूत झाले आहेत. भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील (Kapil Patil) यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी केला. जालना मतदार संघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी केला. तर दिंडोरी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर भगरे यांनी पराभव केला.

नव्या लोकसभेत 280 खासदार पहिल्यांदाच

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच देशभरातून 280 खासदार निवडून आले आहेत. त्यासोबतच 237 हे यापूर्वी निवडून आलेले आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून गेले आहेत. त्यापैकी 29 खासदार पाहिल्यांदा निवडून आले आहेत तर दुसरीकडे 19 खासदार यापूर्वी निवडून आलेले आहेत.

SCROLL FOR NEXT