Gurpatwant Singh Pannun, PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : ...तर तपास केला जाईल! पन्नूच्या हत्येच्या कटावर मोदी पहिल्यांदाच बोलले

India-America : निखिल गुप्ताविरोधात अमेरिकेतील कोर्टात खटला...

Rajanand More

Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरुपतवतसिंग पन्नू याच्या हत्येचा कट भारतीय नागरिक निखिल गुप्ता याने रचल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. गुप्ताविरोधात कोर्टात खटलाही दाखल करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली असली तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भाष्य करण्यात आले नव्हते.

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) मंगळवारी ‘फायनान्शयल टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे वक्तव्य केले आहे. पंतप्रधानांकडून पहिल्यांदाच भाष्य करण्यात आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्हाला कोणी माहिती देत असेल तर त्याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. एखाद्या नागरिकाने चुकीचे कृत्य केले असेल तर त्याची चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कायद्याचे पालन करण्याविषयी आम्ही कटिबध्द आहोत. अशा काही घटना जगातील सर्वात मोठ्या दोन अर्थव्यवस्थांना आणि प्रमुख लोकशाही देशांमधील संबंधांवर परिणाम करू शकत नाहीत, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. दरम्यान, मागील एक-दीड महिन्यापासून पन्नूच्या हत्येच्या षडयंत्रावरून अमेरिकेने केलेल्या आरोपांबाबत चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमेरिकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निखिल गुप्ता आणि एक भारतीय सरकारी कर्मचारी यांनी अनेक महिने फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधला. या संवादामध्ये संबंधित कर्मचाऱ्याने गुप्ता याला पन्नूच्या हत्येचा कट रचण्यास सांगितले होते. त्याबदल्यात भारतात गुप्ताविरोधात सुरू असलेला एक खटला बंद करण्यात मदत केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. दोघांमध्ये दिल्लीत समोरासमोर चर्चाही झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत अशा घटनांना गांभीर्याने घेतो. कारण अशा घटना आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हितकारक नसतात. संबंधित विभाग आधीपासून या घटनेची चौकशी करत आहे. एक उच्चस्तरीतीही स्थापन करण्यात आली आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT