PM Narendra Modi Sarkarnama
देश

पंतप्रधान मोदींचे अकाऊंट हॅक; ट्विटरच्या तपासात काय आलं समोर? कंपनीचा खुलासा...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : हॅकर्सनी रविवारी पहाटे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याचे उघड झाले आहे. काही काळापुरते हे अकाऊंट हॅक करून हॅकर्सने बिटकॉईनशी (Bitcoin) संबंधित एक घोषणाही करून टाकली होती. पंतप्रधान कार्यालयाच्या तक्रारीनंतर ट्विटरकडून हे अकाऊंट पुर्ववत करण्यात आले आहे. त्यानंतर कंपनीकडून एक निवेदन प्रसिध्द करून याबाबत खुलासा केला आहे.

ट्विटरकडून सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान कार्यालयाशी 24 तास संवादाचे मार्ग खुले आहेत. त्यामुळे आम्हाला हॅकिंगची माहिती मिळाल्यानंतर लगेचच अकाऊंट सुरक्षित करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात आली. आतापर्यंतच्या आमच्या तपासामध्ये समोर आले आहे की, या कालावधीमध्ये इतर कुणाचेही अकाऊंट प्रभावित झाल्याचे संकेत मिळालेले नाहीत, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

काय केली होती घोषणा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्विटर अकाऊंटवरून दररोज ट्विट करत असतात. त्यांचे दैनंदिन महत्वाचे कार्यक्रम, भाषणे, देशभरातील विविध महत्वाच्या घडामोडींवर भाष्य, घोषणा ते करतात. रविवारी पहाटे अशीच एक घोषणा त्यांच्या याच अकाऊंटवरून करण्यात आली. भारताने अधिकृतपणे बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याची घोषणा त्यात करण्यात आली. सरकारने 500 बिटकॉईन खरेदी केली असून ते देशातील नागरिकांना वाटली जाणार आहेत, असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

रविवारी पहाटे 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. मागील काही दिवसांपासून बिटकॉईनवर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच हे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. पंतप्रधानांनी पहाटे हे ट्विट केल्यानं आश्चर्यही व्यक्त केलं जाऊ लागलं. पण सुमारे तासाभराने पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत खुलासा करण्यात आला. पंतप्रधानांच ट्विटर अकाऊंट काही काळापुरते हॅक झाल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान कार्यालयाकडून आवाहन

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट अकाऊंट काही काळापुरते हॅक झाले होते. त्यानंतर ट्विटकडे याबाबत तक्रार गेल्यानंतर हे अकाऊंट पुन्हा पुर्ववत करण्यात आले आहे. या काळात कोणतंही ट्विट केलं असल्यास त्याकडं दुर्लक्ष करायला करावे,' असं पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटवर म्हटलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून हॅकर्सचा सोध घेतला जात असून त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

मागील वर्षी हॅकिंग

दरम्यान, मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यातही पंतप्रधान मोदींच्या संकेतस्थळाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी क्रिप्टोकरन्सीबाबत हे ट्विट होतं. तसेच नागरिकांना कोविडसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये दान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच हे अकाऊंट हॅक जॉन विक नावाच्या व्यक्तीने हॅक केल्याचे ट्विट त्यावरच करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT